AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi Team India : टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर थेट जून महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला सातत्याने मालिका खेळायच्या आहेत. जाणून घ्या.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या
Vaibhav Suryavanshi U19 Team IndiaImage Credit source: @surya_14kumar X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 12, 2026 | 11:08 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक्शन मोडमध्ये येणार आहे. टीम इंडियाला जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंडर 19 टीम इंडियातील फलंदाज वैभव सूर्यवंशी याने भारताला वर्ल्ड कप (U19 World Cup 2026) जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती.  त्यामुळे वैभवला सिनिअर टीम इंडियात संधी मिळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.

टीम इंडियाचा जूनपासून भरगच्च कार्यक्रम

टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर आपली पहिली आंतरराष्ट्रीय मालिका मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध् खेळणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात फक्त 1 कसोटी सामना होणार आहे. उभयसंघातील हे एकूण 4 सामने 6 ते 20 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.

टीम इंडियाचा इंग्लंडल दौरा 2026

अफगाणिस्तान विरूद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 1 ते 19 जुलै दरम्यान या दोन्ही मालिका खेळवण्यात येणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळू शकते. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे टी 20i आणि कसोटी मालिका खेळवण्याबाबत विनंती केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचाही भारत दौरा नियोजित आहे. विंडीज 3 वनडे आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे.

आशियाई गेम्स

टीम इंडियाने गेल्या वेळेस ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. यंदा ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची झिंबाब्वे विरुद्ध टी 20i मालिका होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियाच्या मालिकांचा सपाटा हा ऑक्टोबरपर्यंत सुरुच असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय, टी 20i आणि कसोटी मालिका नियोजित आहे. तसेच बांगलादेश विरूद्धच्या स्थगित मालिकेबाबतही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या अशा सातत्याने होणाऱ्या मालिकांमुळे टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला कोणत्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...