AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : 5 सामने-1 मालिका, इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20I सीरिज खेळणार, पहिला सामना केव्हा?

India vs England T20i Series 2026 : टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपली पहिली टी 20i मालिका इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत यजमान संघाविरुद्ध एकूण 5 टी 20i सामने खेळणार आहे.

IND vs ENG : 5 सामने-1 मालिका, इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20I सीरिज खेळणार, पहिला सामना केव्हा?
Indian Cricket TeamImage Credit source: @OfficialAbhi04 X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 12, 2026 | 8:11 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप विजयानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकून अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारत न्यूझीलंडला पराभूत करुन सलग 2 आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच संघ ठरला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी करुन दाखवली.या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसी आणि बीसीसीआयकडून कोटींमध्ये बक्षिस रक्कम देण्यात आली. खेळाडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आता त्यानंतर टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपली पुढील टी 20I मालिका केव्हा खेळणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड कप विजयानंतर सध्या विश्रांती करत आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्च ते जवळपास संपूर्ण मे महिना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जून महिन्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिली आंतरराष्ट्रीय मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. उभयसंघात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. तर अफगाणिस्तानच्या या भारत दौऱ्याची सांगता ही एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. मात्र आपण वर्ल्ड कप स्पर्धेनंतर होणाऱ्या पहिल्याच टी 20I मालिकेबाबत जाणून घेणार आहोत.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर इंग्लंड विरुद्ध पहिली टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 1 ते 19 जुलै दरम्यान टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित टी 20i कर्णधार आहे. या हिशोबाने सूर्यकुमार यादव हाच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत टी 20I मालिका

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याची सुरुवात टी 20I मालिकेने करेल. या मालिकेत एकूण 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहे.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 1 जुलै, चेस्टर ली स्ट्रीट.

दुसरा सामना, 4 जुलै, मँचेस्टर.

तिसरा सामना, 7 जुलै, नॉटिंघम.

चौथा सामना, 9 जुलै, ब्रिस्टोल.

पाचवा सामना, 11 जुलै, साऊथम्पटन.

उभयसंघात 1 ते 11 जुलै दरम्यान टी 20I मालिका खेळवण्यात येईल. त्यानंतर उभयसंघात 14 ते 19 जुलै दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगेल. या मालिकेत शुबमन गिल नेतृत्व करेल. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे खेळताना दिसतील.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली