
बिहार : बिहार राज्यातील (bihar crime news in marathi) गोपालगंज (gopalganj) परिसरातील हे प्रकरण आहे. दीड वर्षापूर्वी हिमाचल प्रदेशातील (himachal pradesh) एका मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी (bihar police) तिच्यासोबत किंवा संबंधात असलेल्या लोकांची चौकशी सुरु केली होती. पोलिसांनी दीड वर्षानंतर आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला हिमाचल प्रदेशातून अटक केली आहे. आरोपी तिथल्या एका गावात वास्तव करीत होती.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील सत्य उजेडात आलं आहे. छपरा जिल्ह्यातील इशवापूर परिसरातील गोहा गावातील मंतोष यादवची पत्नी गुड्डी ही त्या मुलीची हत्या केली आहे. मंतोष यादव हा ट्रेनमध्ये समोरा आणि भेळ विकायचा. त्यावेळी त्याची ओळख हिमाचलमध्ये राहणाऱ्या निशि कुमारी हिच्याशी झाली. दोघांच्या अनेक भेटी झाल्या, त्याचबरोबर ओळखी वाढल्या आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यावेळी मंतोष यादवच्या बायकोला या प्रकरणाची माहिती मिळाली, त्यावेळी तिने तरुणीला संपवायचा विचार सुरु केला.
नवरा आणि बायकोने मिळून एक प्लॅन तयार केला, तरुणीला बहिणीच्या लग्नासाठी बोलावून घेतलं. त्या तरुणीला हिमाचल प्रदेशातून बिहारला बोलावून घेतलं होतं. नवरा बायकोने गोविंद यादव याला सुध्दा यामध्ये समाविष्ठ केले. बहिणीचं लग्न झाल्यानंतर मंतोष यादव निशी या तरुणीला फिरण्यासाठी बाहेर घेऊन गेला.
एका निर्जनस्थळी गेल्यानंतर तिघांनी मिळून त्या तरुणीचा गळा दाबला. त्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह तिघांनी तिथल्या झाडाच्या खाली फेकून दिला. ज्यावेळी पोलिसांना तो मृतदेह मिळाला. त्यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात केस दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी काही तांत्रिक गोष्टीचा आधार घेऊन लोकेशन शोधून काढलं. त्यावेळी पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना आरोपी कोण असल्याची माहिती मिळाली. ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची अधिक माहिती शोधली. त्यावेळी त्यांना हिमाचल प्रदेशमधील लोकेशन मिळालं. पोलिसांनी गोविंदला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे.