गुहेत शिकारीसाठी घुसलेला तरुण 7 दिवसानंतरही बाहेर आला नाही, त्याचं काय झालं असेल ?

शिकारीसाठी गुहेत घुसलेला तरुण अद्याप बाहेर न परतल्यामुळे अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याचं आतमध्ये काय झालं असेल असंही अनेकांना वाटतं आहे. पोलिस प्रशासन त्याचा शोध घेत आहे.

गुहेत शिकारीसाठी घुसलेला तरुण 7 दिवसानंतरही बाहेर आला नाही, त्याचं काय झालं असेल ?
rescue team
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2023 | 2:45 PM

राजस्थान : शिकारीसाठी गेलेली व्यक्ती सात दिवस झाल्यानंतर सुध्दा गुहेतून बाहेर आलेली नाही. गुहेतुन प्रचंड दुर्गधी येत असल्यामुळे लोकांनी (crime news) शंका व्यक्त केली आहे. ज्यावेळी गुहेत गेलेला माणून परतला (latest news) नाही, त्यावेळी तिथल्या लोकांनी माहिती पोलिस प्रशासनाला दिली होती. त्यानंतर तिथं रेस्क्यू टीमकडून (rescue team) आतमध्ये एक कॅमेरा पाठवला आहे. त्यामध्ये त्या तरुणाचा एक टॉवेल दिसला आहे. परंतु तरुण अजिबात दिसलेला नाही. त्या गुहेत सुध्दा घनदाट जंगल आहे, त्यामुळे आतमधील गोष्टी जाणून घेण्यास अनेक अडचणी येत आहेत.

ही गुहा राजस्थान राज्यातील प्रतापगड सादेडी येथील काकडा गावात आहे. एका टीमला त्या व्यक्तीचा टॉवेल मिळाला आहे. माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शनिवारी पाहणी केली. तिथं आणखी काही पथक पाठवण्यात येणार असून तरुणाचा शोध घेतला जाणार आहे.

कंबोलिया गावातील रामलाल मागच्या आठवड्यात शिकारीसाठी दोन मित्रासोबत गुहेत गेला होता. रामलाल शिकारीसाठी आतमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी रामलाल आतमध्ये गेला, त्यावेळी तो जोरात ओरडत होता. खूपवेळ तो बाहेरचं आला नाही. साधारण अर्धा तासाने त्याचा आतला आवाज यायचा बंद झाला.

रामलालला त्याचे मित्र तिथून बाहेर निघण्यास सांगत होते. परंतु तो बाहेर आला नाही. दोघेही रात्री आठवाजेपर्यंत गुहेच्या तोंडावर होते. त्यानंतर त्या दोघांनी ही माहिती गावातल्या सगळ्या लोकांना सांगितली. त्यानंतर गावातल्या लोकांनी तिथं जाऊन पाहणी केली. काही लोकांनी तिथं तीन दिवस मुक्काम केला. त्यानंतर गावातल्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी रेस्क्यू करण्यासाठी जेसीबी मशीन, ड्रिल मशीन, अग्निशमन दलाला तिथं पाचारण केलं. परंतु घनदाट जंगल असल्यामुळे अनेक अडचणी तिथं निर्माण झाल्या आहेत.