BREAKING : हॉटेल व्यावसायिकाची सून आणि दोन बहिणींना निर्घृणपणे संपवलं, मंगळवेढ्यात खळबळ

मंगळवेढा येथे तीन महिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात ही धक्कादायक घटना घडलीय. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या झालीय.

BREAKING : हॉटेल व्यावसायिकाची सून आणि दोन बहिणींना निर्घृणपणे संपवलं, मंगळवेढ्यात खळबळ
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 21, 2023 | 8:43 PM

सोलापूर : मंगळवेढा (Mangalwedha) येथे तीन महिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर (Nandeshwar) गावात ही धक्कादायक घटना घडलीय. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या झालीय. संबंधित घटना ही आज दुपारी घडली. घटना उघड झाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडालीय. संबंधित घटना घडली तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते? नेमकं काय घडलं असेल? या घटनेतील हल्लेखोराने इतकी निर्घृणपणे हत्या का केली असेल? असे अनेर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. दिपाली माळी, पारूबाई माळी, संगीता माळी अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. घराशेजारील समाधान लोहार या व्यक्तीने या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलिसांनी समाधान लोहार या संशयित आरोपीस ताब्यात घेतलंय.

पोलिसांचा तपास सुरु

लोहार आणि माळी हे शेजारी शेजारी आहेत. बऱ्याच महिन्यांपासून असलेल्या दोघांमधील वादांतून ही घटना घडल्याचे आता बोलले जात आहे. हत्याचे कारण अद्याप जरी अस्पष्ट असले तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन अधिकचा तपास करीत आहेत.

महादेव माळी यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. महादेव माळी यांच्या बहिणी नंदेश्वर येथे आल्या होत्या. या दरम्यान त्यांच्या दोन्ही बहिणी आणि सूनेची निर्घृण हत्या झालीय. दीपाली बाळू माळी (वय 25) ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी (वय 45), संगीता महादेव माळी (वय 50) या दोन बहिणी होत्या.

या तीनही महिलांची हत्या झालीय. धक्कादायक म्हणजे दगडाने काठीने मारहाण करून हत्या झाली आहे. त्यामुळे एवढी मारहाण होईपर्यंत कुणीच मध्यस्थी कशी केली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.