
देशातही अशा अनेक महिला होत्या ज्यांनी गुन्हेगारींच्या जगात नाव कमावले. काही किडनॅपिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या तर काही सायनाइड किलर बनल्या. अशाच १० लेडी डॉनच्या कहाण्या जाणून घेऊया, ज्यांच्या नावाने लोक हादरले. संतोकबेन साराभाई जडेजा : १४ लोक मारले गुजरातच्या संतोकबेन साराभाई जडेजा यांना गॉडमदर म्हणूनही ओळखले जाते. ८० च्या दशकात, पोरबंदरमधील एका गिरणीच्या मालकांनी संप मिटवण्यासाठी स्थानिक गुन्हेगाराची मदत घेतली. मिलजवळ पोहोचल्यावर त्याची हत्या करण्यात आली. यामध्ये सरमन मुंजा जडेजाचे नाव आले, जो त्याच मिलमध्ये मजूर म्हणून काम करायचा. परिसरातील गुन्हेगाराची हत्या केल्यानंतर सरमनने त्याचे पद बळकावले आणि तो स्वतः डॉन बनला. १९८६ मध्ये, जेव्हा सरमनचाही खून झाला तेव्हा त्याची पत्नी संतोकबेनने पदभार स्वीकारला, ज्यांनी आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पोरबंदरमध्ये १४ लोकांची हत्या केली. यासाठी एक टोळी तयार करण्यात आली, ज्यात शंभरहून अधिक लोक होते. गॉडमदर बनलेल्या संतोकबेनवर एकामागून...