Maharashtra FDA: मुंबई, अक्कलकोट ते नागपूर..FDAची राज्यव्यापी कारवाई; तुकाराम मुढेंचा सर्वात मोठा दणका

पुण्यानंतर आता एफडीएने राज्यभरात आपल्या कारवाईचा धडाका लावला असून या राज्यव्यापी कारवाईत एकूण ₹१ कोटी ९७ लाखांहून अधिक किमतीचा संशयास्पद व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra FDA: मुंबई, अक्कलकोट ते नागपूर..FDAची राज्यव्यापी कारवाई; तुकाराम मुढेंचा सर्वात मोठा दणका
| Updated on: Nov 17, 2026 | 6:35 PM

Maharashtra FDA Action:  काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने पुण्यामध्ये मोठी कारवाई केली होती. पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपालीवर कारवाई करत एफडीएने थेट परवाना रद्द केला होता. पुण्यानंतर आता एफडीएने राज्यभरात आपल्या कारवाईचा धडाका लावला असून या राज्यव्यापी कारवाईत एकूण ₹१ कोटी ९७ लाखांहून अधिक किमतीचा संशयास्पद व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

एफडीची राज्यव्यापी कारवाई! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने केलेल्या राज्यव्यापी धडक कारवाईत एकूण ₹१ कोटी ९७ लाखांहून अधिक किमतीचा संशयास्पद व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई, पालघर, अक्ललकोट, तसेच नागपूरमध्येही ही कारवाई करण्यात आली आली आहे.

Loading...

एफडीएने नवी मुंबईत खजूर आणि दालचिनीच्या गोदामावर छापा टाकून ९७,५७८ किलो वजनाचा तब्बल ₹१,११,०३,९०४ किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पालघरमध्ये दोन ट्रकमधून विनालेबल आणि बॅच क्रमांक नसलेली ५९,४९६ किलो सुपारी (किंमत ₹६८,७१,७८८) जप्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर  अक्कलकोटमध्ये अस्वच्छ साठवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८२९ किलो पेढा-हलवा (किंमत ₹२,५०,०२०) जप्त करण्यात आला असून ४ दुकाने बंद करण्यात आली आहेत.तसेच नागपूरमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी पेढीचा मैसूरपाक नमुना असुरक्षित घोषित झाल्याने FDA ने त्यांचा परवाना निलंबित केला आहे.

तुकाराम मुंढेंची दहशत; भेसळखोरांना लगाम! 

दरम्यान, धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार स्विकारल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. छोट्या हॉटेल्सपासून, बेकरी, दूध डेअरी आस्थापने तसेच मोठमोठ्या बँड्सच्या हॉटेल्सवर तुकाराम मुंढे यांच्या एफडीएने धाड टाकली आहे. तुकाराम मुंढेंच्या कामाच्या धडाक्यामुळेच भेसळखोरांचे धाबे दणाणले असून सर्व आस्थापनांमध्ये स्वच्छता दिसू लागली आहे. नागरिकांमधून तुकाराम मुंढेंच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us