
कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) ठाणे एटीएसने (Thane ATS) कारवाई करत दोन बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. जो व्यक्ती पळून गेला त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचबरोबर पळून गेलेल्या व्यक्तीने बांग्लादेशी लोकांना आसरा दिल्याची माहिती पोलिसांनी समजली आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशी काही व्यक्ती उल्हासनगरात मधील कृष्णा नगर परिसरात राहत असल्याची पोलिसांना खबर मिळाली होती. ही माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी राहत असलेल्या ठिकाणी छापे मारी केली.
उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील कृष्णा नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मुंबई एटीएसच्या ठाणे युनिटला मिळाली होती. एत्यानुसारटीएसच्या पथकाने शुक्रवारी उल्हासनगरमध्ये धाड टाकत तीन बांगलादेशींना ताब्यात घेतलं. यापैकी लिटन शेख आणि शुकर अली नाजीर शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर त्याच्यासोबत असलेल्या एका सोळा वर्षीय मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सगळ्यांना उल्हासनगरमध्ये आश्रय देणारा खलील मंडल हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस आणि मुंबई एटीएस कडून सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी दिली.