AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिकवता, शिकवता विद्यार्थिनीच्या नजरेत भरला मौलवी, दोघे प्रेमसागरात असे बुडाले की, एकदिवस…

मदरशात तालीम ग्रहण करण्यासाठी माजी प्रधानाची मुलगी सुद्धा यायची. तो तिची ट्यूशन घ्यायचा. ट्यूशन घेण्यासाठी तो तिच्या घरी जायचा. 9 वर्षांपासून निसार खां विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिची ट्यूशन घेत होता.

शिकवता, शिकवता विद्यार्थिनीच्या नजरेत भरला मौलवी, दोघे प्रेमसागरात असे बुडाले की, एकदिवस...
Crime News
| Updated on: Aug 09, 2025 | 12:20 PM
Share

एक मौलवी त्याच्या मदरशात शिकायला येणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. तो तिला ट्यूशनही द्यायचा. अचानक एकदिवस दोघे गायब झाले. आधी वाटलं की, मौलवी मुलीला घेऊन पळून गेलाय. पण, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले. पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. जहांगीरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एक माजी प्रधानाच्या मुलीचं दिवसा-ढवळ्या अपहरण झालं. पोलिसांनी ही केस सोडवली. पण स्टोरी काही वेगळीच निघाली. विद्यार्थीनी आपल्या मर्जीने मौलवीसोबत पळून गेली होती. कुटुंबियांना असं वाटतं होतं की, मुलीला किडनॅप केलय. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधील हे प्रकरण आहे.

संतकबीरनगर जनपदच्या पोखरा भिटवा गावातील निवासी निसार खां जहांगीरगंज येथील मदरशात अनेक दशकापासून शिकवत होता. त्या मदरशात तालीम ग्रहण करण्यासाठी माजी प्रधानाची मुलगी सुद्धा यायची. तो तिची ट्यूशन घ्यायचा. ट्यूशन घेण्यासाठी तो तिच्या घरी जायचा. 9 वर्षांपासून निसार खां विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिची ट्यूशन घेत होता.

प्रेमाची अशी काही नशा चढली की…

ट्यूशनची शिकवणी देता देता निसार खां ची माजी प्रधानाच्या मुलीसोबत जवळीक वाढली. विद्यार्थिनीचा सुद्धा मौलवीवर जीव जडला. दोघांवर प्रेमाची अशी काही नशा चढली की, त्यांना गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचाही विसर पडला. गुरुवारी दोघे अचानक गायब झाले. बातमी अशी पसरली की, मौलवी निसार खां माजी प्रधानाच्या मुलीला घेऊन पळून गेलाय. माजी प्रधानांन मुलीच अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेचच आरोपीला शोधून काढलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

अपर पोलीस अधीक्षक श्याम देव यांनी सांगितलं की, “विद्यार्थिनीच किडनॅपिंग झालं नव्हतं. ती स्वत:च्या मर्जीने मौलवी सोबत गेली होती” दोघांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मौलवीच्या कृत्यामुळे संपूर्ण भागात संतापाच वातावरण आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट