बँकेत प्रेम बहरलं, लग्नाच्या 8 वर्षानंतर बायकोने असे रंग दाखवले की..असिस्टेंट मॅनेजर नवऱ्यासाठी सगळच संपलं

अंकितने एप्रिल 2017 मध्ये युवतीसोबत लव्ह मॅरेज केलं. दोघे बँक ऑफ बडोदाच्या मैनपुरी शाखेत कार्यरत होते. तिथे त्यांचं प्रेम प्रकरण सुरु झालं.

बँकेत प्रेम बहरलं, लग्नाच्या 8 वर्षानंतर बायकोने असे रंग दाखवले की..असिस्टेंट मॅनेजर नवऱ्यासाठी सगळच संपलं
love Marriage
| Updated on: Aug 06, 2025 | 9:17 AM

बँक कर्मचारी अंकित गोयलचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत मिळाला होता. या प्रकरणात अंकितच्या आईने त्याच्या पत्नीवर छळाचा आरोप करत तक्रार नोंदवली. माझ्या सूनेने अंकितकडे 20 लाख रुपये मागितले होते. पैसे दिले नाहीत, तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिलेली. त्यामुळे अंकित खूप त्रस्त होता असं अंकितच्या आईने सांगितलं. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील ही घटना आहे.

असिस्टेंट मॅनेजर असलेल्या अंकितने हॉटेलमध्ये 1 ऑगस्ट रोजी एक खोली भाड्यावर घेतली होती. दुसऱ्यादिवशी तो खोली बाहेर पडला नाही, त्यावेळी हॉटेलवाल्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी अंकितचा मृतदेह त्यांना आढळला. तोंडातून फेस येत होता. समजलं की, अंकितने विष प्राशन करुन जीवन संपवलय. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अंकितच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील कारवाई सुरु आहे.

बँकत सुरु झाली लव्ह स्टोरी

अंकितने एप्रिल 2017 मध्ये मैनपुरीच्या युवतीसोबत लव्ह मॅरेज केलं. दोघे बँक ऑफ बडोदाच्या मैनपुरी शाखेत कार्यरत होते. तिथे त्यांचं प्रेम प्रकरण सुरु झालं. लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये वैवाहिक मतभेद निर्माण झाले. त्यानंतर सून मुलावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होती असं अंकितच्या आईच म्हणणं आहे.

अंकितला किती दिवसांची मुदत दिलेली?

रुपा देवी यांनी सांगितलं की, जून महिन्यापासून मुलगा आणि सून वेगवेगळे राहत होते. सून माझ्या मुलाला हुंड्याच्या प्रकरणात फसवण्याची धमकी देत होती. एक ऑगस्टच्या सकाळी अंकितने पत्नीसोबत फोनवर चर्चा केली. 4 ऑगस्टपर्यंत 20 लाख रुपये दिले नाहीत, तर खटला दाखल करण्याची सूनेने धमकी दिलेली, असं अंकितच्या आईने सांगितलं. अंकित यामुळे हैराण झालेला. तो दुपारी 12.30 वाजता घरातून निघाला. पण संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. बरीच शोधाशोध केल्यानंतरही त्याची माहिती मिळाली नाही. मग दोन ऑगस्टच्या सकाळी फोन आला की, अंकितने दिल्ली रोड येथील एका हॉटेलमध्ये जीवन संपवून घेतलय.

मरण्याआधी त्याने एक व्हिडिओ बनवलेला

पोलिसांनी सांगितलं की, “1 ऑगस्टच्या दुपारी अंकितने हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. पण दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत तो खोलीतून बाहेर आला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी अंकितचा मृतदेह त्यांना आढळला. तोंडातून फेस येत होता. समजलं की, अंकितने विष प्राशन करुन जीवन संपवलय” मरण्याआधी त्याने एक व्हिडिओ बनवलेला. पोलीस म्हणाले की तपास सुरु आहे.