UP Crime | प्रेमाच्या त्रिकोणातून विद्यार्थ्याची हत्या, 48 तासात गूढ उकलले, हॉस्टेलमधून तरुणाला अटक

आरोपी आदित्य धरने सांगितले की, 7 मे रोजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना तवा रेस्टॉरंटजवळ सुयश सिंग आणि प्रियांशू यांच्यासोबत पुन्हा वाद झाला. यादरम्यान मारामारी होऊन त्याने सुयशची चाकूने वार करुन हत्या केली.

UP Crime | प्रेमाच्या त्रिकोणातून विद्यार्थ्याची हत्या, 48 तासात गूढ उकलले, हॉस्टेलमधून तरुणाला अटक
Image Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 10, 2022 | 12:30 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी (Uttar Pradesh Crime News) येथे झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाचे गूढ (Student Murder Case) उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे लव्ह ट्रँगल (Love Triangle) आहे. अटकेनंतर चौकशीत आरोपी आदित्य धर द्विवेदी याने सांगितले की तो आणि मृताचा (सुयश सिंग) मित्र प्रियांशू हे रामस्वरूप विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. विद्यापीठातच शिकणाऱ्या प्रियांशू आणि रवी पांडे यांच्यात एका मुलीवरुन वाद झाला होता. जवळपास 10 दिवसांपूर्वीही कॉलेज कॅम्पसमध्ये याच कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती.

नेमकं काय घडलं?

आरोपी आदित्य धरने सांगितले की, 7 मे रोजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना तवा रेस्टॉरंटजवळ सुयश सिंग आणि प्रियांशू यांच्यासोबत पुन्हा वाद झाला. यादरम्यान मारामारी होऊन त्याने सुयशची चाकूने वार करुन हत्या केली.

आरोपीकडून चाकूने वार

मृत सुयश सिंगचे वडील घनश्याम सिंग यांनी कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले की, सात मे रोजी त्यांच्या मुलाचा काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता. तवा रेस्टॉरंटजवळ आरोपी आदित्य द्विवेदी याने त्याच्या 4-5 साथीदारांसह त्यांच्या मुलावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. उपचारादरम्यान सुयशचा मृत्यू झाला.

48 तासांत गूढ उकललं

प्रियांशू आणि रवी पांडे यांच्यात एका मुलीवरुन वाद झाला होता. जवळपास 10 दिवसांपूर्वीही कॉलेज कॅम्पसमध्ये याच कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर 48 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. आरोपी आदित्य धर द्विवेदी याला जिल्हा बस्ती येथील वसतिगृहातून अटक करण्यात आली.

आरोपींच्या सांगण्यावरून खुनात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, लव्ह ट्रँगलमधून ही हत्या झाली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.