
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये एका युवकाला विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणं महाग पडलं. विवाहितेच्या पतीला दोघांच्या अनैतिक संबंधांबद्दल समजलं होतं. गर्लफ्रेंडने प्रियकराला सांगितलं, ऐक, आता आपण संबंध ठेवायचे नाहीत. माझ्या नवऱ्याला समजलं आहे. पण बॉयफ्रेंडने तिचं म्हणणं ऐकलं नाही. बोलला, तुला माझ्यासोबत संबंध ठेवावेच लागतील. प्रियकर ऐकायला तयार नव्हता. अखेर महिलेने पतीच्या साथीने मिळून प्रियकराचा विषयच संपवून टाकला.
बॉयफ्रेंडची हत्या केल्यानंतर बुलंदशहर जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट सुद्धा लावली. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितलं की, डासना निवासी अब्दुल वाहिद नावाच्या व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह जहांगीराबाद पोलीस ठाणे क्षेत्रात फेकून दिला. हत्येच्या आरोपाखाली गाजियाबाद जिल्ह्यातील मधुबन बापूधाम क्षेत्राचे निवासी अमित चौधरी (32) आणि त्याची पत्नी प्रियंका (31) अटक करण्यात आली आहे.
तिला हे संबंध कायम ठेवायचे नव्हते
पोलिसांनी सांगितलं की, प्रियंकाचे वाहिदसोबत अनैतिक संबंध होते. पण तिला हे संबंध कायम ठेवायचे नव्हते. पण वाहिद या संबंधांसाठी जबरदस्ती करत होता. म्हणून लोखंडाच्या पाईपने डोक्यावर वार करुन वाहिदची हत्या करण्यात आली. या प्रकरणात अब्दुल वाहिदचा मुलगा हामिद अलीने 25 जूनला तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
जंगलात फेकला मृतदेह
28 जूनला वाहिदचा मृतदेह बुलंदशहर जिल्ह्यात सापडला. चौकशी दरम्यान आरोपींनी वाहिदच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करुन हत्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कारमध्ये मृतदेह भरुन जहांगीराबादच्या जंगलात फेकला.
त्याने प्रियंकाला खूप सुनावलं
पोलिसांनुसार, आरोपींनी चौकशीत कबूल केलं की, डासना खेड्यात राहणाऱ्या वाहिदची प्रियंकाशी जुनी ओळख होती. त्याच्यासोबत अनैतिक संबंध होते. प्रियंकाचा पती घरी नसताना वाहिद अनेकदा तिच्या घरी जायचा. जेव्हा अमितला पत्नी वाहिदसोबतच्या कथित अनैतिक संबंधांबद्दल समजलं, तेव्हा त्याने प्रियंकाला खूप सुनावलं. भविष्यात वाहिदने घरी येऊ नये, असा इशारा सुद्धा दिला. म्हणून प्रियंकाने वाहिदला घरी येण्यास मनाई केली, तरीही तो आला.
वाहिदच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार
एसीपीने या प्रकरणात सांगितलं की, वाहिद घरी आल्यानंतर प्रियंकाने पती अमितला फोन केला. त्याने वाहिदला तिथून जाण्यास सांगितलं. पण तिथून निघून जाण्याऐवजी त्याने अमितशी वाद घातला. चिडलेल्या अमितने पत्नीला वाहिदला मारहाण करायला सांगितली. त्यानंतर प्रियंकाने वाहिदच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार केला. त्याचा त्यात मृत्यू झाला. एसपीने सांगितलं की, या जोडप्याने वाहिदची मोपेड घराच्याजवळ झुडूपाच्या मागे लपवली. मृतदेह चादरीत लपेटून जहांगीराबाद येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडूपात फेकला. सध्या अटक केलेल्या आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.