
एका जोडप्याने विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बराचकाळ प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी पाच वर्षांपूर्वी लग्न केलं. या लग्नाला दोघांच्या घरच्यांनी विरोध केला होता. प्रेमाखातर दोघांनी घर सोडलं. पनकी येथे दोघे राहत होते. आता दोघांच्या एकत्र मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आतापर्यंतच्या तपासात दोघांच्या मृत्यूच ठोस कारण समोर आलेलं नाही. आसपास शेजारी चौकशी केल्यानंतर दोघे सुखी, आनंदी जीवन जगत असल्याच समजलं. मग, आता पोलीसही हैराण आहेत की, दोघांनी जीवन का संपवलं?. कानपूरच्या नौबस्ता येथे राहणारी सलोनी सचान आणि अलकेश सचान परस्परांवर प्रेम करायचे. दोघांना परस्परांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबिय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते.
फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास
अशा परिस्थितीत दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं. दोघे पनकीच्या पतरसा गावात भाड्याच्या घरात राहू लागले. पोलिसांनुसार, दोघे परस्पर सहमतीने आनंदात राहत होते. रविवारी दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व दोघांना रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केलं. ही घटना घडल्यानंतर त्यामागची कारणं शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने चौकशी सुरु केली आहे.
पाच वर्षात असं काय झालं?
दोघांनी एकत्र राहण्यासाठी कुटुंबाची साथ सोडलेली. भांडण केलेलं, असं पोलीसच नाही, कुटुंबिय सुद्धा विचार करत आहेत. पाच वर्षातच असं काय झालं, दोघांना इतकं मोठ पाऊल उचलावं लागलं. पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाइडची चिठ्ठी मिळालेली नाही. त्यामुळे या दोघांनी स्वत:हून विष प्राशन केलं की, कोणी यांना विष दिलं, ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.