
नवरा गाढ झोपेत होता. त्याचवेळी बायकोने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर बायको तिथून पळून गेली. पत्नीच्या या कृत्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पत्नीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पतीला उपचारासाठी जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. या प्रकरणात पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरुन आरोपी पत्नी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
महाराजगंजच्या सिन्दुरिया पोलीस ठाणे क्षेत्रातील पतरेंगवा सुकऊ गावची ही घटना आहे. पोलीस आरोपी पत्नीचा शोध घेत आहेत. जखमी राजेंद्रच्या वडिलांनी भोला यादव यांनी सिन्दुरिया पोलिसांना सांगितलं की, त्यांना तीन मुलगे आहेत. राजेन्दर आणि इंदर वेगळे राहतात. राजेन्दरच लग्न कुशीनगर जनपद येथे राहणाऱ्या रीता सोबत झालं.
धारदार शस्त्राने वार
रीता आणि राजेन्दर यांच्यात सध्या सतत वाद सुरु आहेत. 16 जुलैला तिने पती विरोधात सिन्दुरिया पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली. शुक्रवारी अर्ध्या रात्री रीताने राजेन्दरवर धारदार शस्त्राने वार केला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाली. आसपासचे लोक राजेंदरला उपचारासाठी महराजगंज येथे घेऊन गेले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सासऱ्याच म्हणणं काय?
आपल्या सूनेने तिचा भाऊ आणि तिच्या वडिलांच्या चिथावणीवरुन सुनियोजित पद्धतीने हा हल्ला केला असा सासऱ्याचा आरोप आहे. आरोपी सून फारर आहे. सिन्दुरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेन्द्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारावर आरोपी महिला रीता विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय.