
नवरदेवाने मोठ्या अपेक्षेने लग्न करुन नवरीला घरी आणलं. त्याने पत्नीसोबत सुंदर आयुष्याची स्वप्न बघितली होती. पण त्याला हे माहित नव्हत की, पत्नीच्या डोक्यात काय चालू आहे. लग्नाच्या पहिल्यारात्रीच नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवरदेवाला या बद्दल समजल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रची ही घटना आहे. बभनी येथे 27 मे रोजी एका युवतीच लग्न झालं. लग्नाला काही तासच झाले होते. नवरी मुलीने असं कांड केलं की, सासरचे सुन्न झाले. नवरीमुलीने सुहागरातच्या आधी बॉयफ्रेंडला बोलावलं. खोलीत नवरदेव येताच नवरी मुलगी बोलली, मी लगेच येते, नवरदेव खोलीत तिची वाट पाहत थांबलेला, पण ती आलीच नाही. नवरी मुलगी बाईकवर बसून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.
नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुलीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. यावरुन मोठा गदारोळ झाला. नवरी आणि तिच्या प्रियकराशी सुद्धा संपर्क साधला. त्यावेळी बॉयफ्रेंडने स्वत:च तिला पुन्हा सासरी पाठवून दिलं. पण इथे येऊन नवरी तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट करु लागली. नातेवाईक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण अखेरीस हा विषय गावच्या पंचायतीकडे गेला.
पंचायतीत काय ठरलं?
शुक्रवारी तीन गावचे प्रधान, ग्रामीण, सासरचे आणि माहेरची मंडळी पंचायतीसमोर आली. यात प्रस्ताव ठेवण्यात आला की, प्रियकराने लग्नात झालेला तीन लाख रुपये खर्च भरुन द्यावा आणि मुलीला आपल्यासोबत घेऊन जावं. हे सुद्धा ठरलं की, मुलीच्या बाजूने जे सामान वर पक्षाला मिळालय, ते प्रियकराला देण्यात येईल.
प्रियकराने काय भूमिका घेतली?
प्रियकर आणि त्याच्या नातेवाईकांनी इतका खर्च उचलण्यास असमर्थता दर्शवली. इतकी मोठी रक्कम तात्काळ देणं शक्य नसल्याच त्यांनी सांगितलं. पंचांच म्हणणं होतं की, निर्णय तात्काळ ऐकावा लागेल. सहमती झाली नाही, तेव्हा वर पक्षाने पोलिसांकडे जाण्याची भूमिका घेतली.