AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम

Wardha Medical Student Car Accident : सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे.

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम
पुलाचा कठडा तोडून कार थेट 40 फूट खोली कोसळली
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 25, 2022 | 8:43 AM
Share

वर्धा : मंगळवारची सकाळ एक भीषण बातमी घेऊन आली. मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा वर्ध्यातील कारच (7 Medical Students killed in Wardha car accident) अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन (Birthday Celebration) करायला हॉस्टेलच्या बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा जिवंत परत येऊ शकणार नाही, अशी निघताना पुसटीशी कल्पना नसेल. सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मेडिकल कॉलेजमधील सात मित्रांच्या महिंद्रा एक्सयूव्ही (Mahindra XUV 500) कारचा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात कार तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती. यात कारचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, याच अपघाताआधीची हकिकत सावंगी मेडिकल कॉलेजचे ओएसडी अभ्यूदय मेघे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितली आहे.

10 वाजता परतायला हवे होते, पण…

अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री दहा वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या हेतून आपण बाहेर आलो असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळवलं होतं. फोनवरुन सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलं होतं. रात्री दहा वाजता हॉस्टेल विद्यार्थी न आल्यामुळे हॉस्टेलमधील वरिष्ठांनाही काळजी लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्यानं सर्वच चिंतित होते. अखेर पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यू बातमी येऊन धडकल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

गाडी कोण चालवत होतं? ओळख पटली!

सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले याचाही या अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना शोककळा पसरली आहे. अपघातातील फक्त एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर एक विद्यार्थी हा ओदिशाचा होता.

सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे. नीरजचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. नदीवरील पुलाचा कठडा तोडून कार थेट चाळीस फूट खाली कोसळली आणि यात सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे दोन विद्यार्ती यावेळी गाडीत होते. या विद्यार्थ्यांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले आणि आणखीन एक विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याचं नाव पवन शक्ती असं असल्याचं ओएसडींनी म्हटलंय.

…आणि स्वप्नांची राख झाली!

या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.

मृतांमध्ये जिल्ह्यातीळ तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा मृत्यू झाला असून इतर 6 जण विविध भागातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले होते. अपघातातील इतर सहा मृतांची नावं खालीलप्रमाणे –

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1 प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2 शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2 पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1

पाहा व्हिडीओ –

भीषण अपघाताची दाहकता या फोटोंवरुन येईल! पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!

आजीसोबत देवदर्शनाला निघालेला चार वर्षाचा नातू जागीच ठार, बीडमध्ये भीषण अपघात!

2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...