Beed Updates: आजीसोबत देवदर्शनाला निघालेला चार वर्षाचा नातू जागीच ठार, बीडमध्ये भीषण अपघात!

आजीसोबत देवदर्शनासाठी निघालेल्या चार वर्षीय नातवाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली. आजीचा हात धरून पायी जात असताना या मुलाला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं.

Beed Updates: आजीसोबत देवदर्शनाला निघालेला चार वर्षाचा नातू जागीच ठार, बीडमध्ये भीषण अपघात!
खोणी तळोजा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक

बीडः आजीसोबत देवदर्शनासाठी निघालेल्या चार वर्षीय नातवाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली. आजीचा हात धरून पायी जात असताना या मुलाला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं. यात त्याचा अपघात स्थळीच मृत्यू झाला. तर मुलाची आजी गंभीर जखमी झाली आहे. या भीषण अपघातामुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कुठे घडला अपघात?

14 जानेवारी रोजी रात्री उशीरा गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील कल्याण- विशाखा पट्टणम् या महामार्गावर ही घटना घडली. चार वर्षांचा चिमुकला त्याच्या आजीसोबत या रस्त्याने देवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाला होता. मात्र मागून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने या दोघांनाही चिरडले. याच चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माऊली अनिरुद्ध चव्हाण, वय 4 वर्षे रा.वंजारवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सुमनबाई जालिंदर चव्हाण असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे.

इतर बातम्या-

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?


Published On - 10:42 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI