Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. निवडणूक आयोगाने या पाचही राज्यातील निवडणुकांची घोषणा करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती.

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा
Election commission

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. निवडणूक आयोगाने या पाचही राज्यातील निवडणुकांची घोषणा करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती. केवळ व्हर्च्युअल रॅलीला परवानगी देण्यात आली होती. आज निवडणूक आयोग याबाबतचा आढावा घेणार आहे. त्यामुळे पाचही राज्यातील रॅली आणि सभांना निवडणूक आयोग परवानगी देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती. मात्र, व्हर्च्युअल कॅम्पेनला परवानगी दिली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच राजकीय पक्षांना पदयात्रा काढण्यास, सायकल रॅली आणि रोड शो करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

डिजीटल माध्यमातून प्रचार करा

दरम्यान, निवडणूक आयोग कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रकोप पाहूनच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन डिजीटल माध्यमातून प्रचार करण्याचं आवाहन केलं होतं. दूरदर्शनवरून प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना दुप्पट वेळ दिला जाणार असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं.

निवडणूक आयोगाचे कान, डोळे बना

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पर्यवेक्षकांनाही काही सूचना केल्या होत्या. निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे बनून पर्यवेक्षकांनी काम करावं. लोकांच्या संपर्कात राहा, निष्पक्ष आणि नैतिक राहा, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मतदारांना निवडणुकीत प्रलोभनं दिली जातात. हे प्रकार रोखण्यासाठी स्वत:च्या कल्पना राबवा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाने पर्यवेक्षकांना दिल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणुका

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात 10,14, 20, 23, 27 फेब्रुवारी, 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. उत्तराखंडमध्येही 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यातही एका टप्प्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

जबरदस्त! भारताचा चीनला ‘दे धक्का’, घातक ‘ब्रह्मोस’ मिसाइल देणार ‘या’ देशाला, 2770 कोटींची डील

पत्रकार कमाल खान यांना अनोखी श्रद्धांजली, वाराणसीतील आजची गंगा आरती खान यांना समर्पित

Published On - 10:31 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI