नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरभररून यश मिळालं. त्यामुळेच आज योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मात्र या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर समोर आलाय.
योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी (yogi adityanath oath ceremony) आहे. शुक्रवार 25 मार्चच्या या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह अनेक मंडळींनी निमंत्रणं दिली गेली आहेत.
उत्तर प्रदेशात योगी कोणत्या तारखेला सरकार स्थापन करतील, यांच्या संभाव्य तारखाही समोर आल्या आहे. एक वृत्तवाहिनीने 25 मार्चला योगींचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी (Yogi Adityanath Oath ceremony) होणार असल्याची माहितीही सुत्रांच्या हवाल्याने दिलीय.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांपैकी 100 जागांवर 'एमआयएम'चे उमेदवार उभे होते. यातली काही हिंदू अपवाद वगळता बहुतांश जण मुस्लीम होते. या पक्षाला एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत, तर अजमगढ आणि मुबारकपूर जागा वगळता इतर सर्व ठिकाणी 'एमआयएम' उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. मात्र...
लखीमपूर (Lakhimpur), हाथरस आणि उन्नाव सारख्या घटनांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अत्यंत संवेदनशील मानल्या गेलेल्या या जिल्ह्यांत कोण निवडून आलं हेही पाहणं महत्त्वाचं आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पल्लवी पटेल यांनी आपल्या प्रचारात बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला. स्वतःला कौशंबीची सून असल्याचे सांगत वातावरण निर्मिती केली. महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांनी मोकाट जनावरांचा मुद्दाही उपस्थित केला.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. त्यावरून भाजपने शिवसेना नेत्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. नोटापेक्षाही शिवसेनेला कमी मते मिळाल्याचं सांगत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलंय. या निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होताना दिसून आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अभिनेता अक्षय कुमार यांच्या फोटोंना घेऊन हे मीम्स नेटकऱ्यांनी बनवले होते.