AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh : यूपीच भाजपचं यंतिस्तान झिंदाबाद, नवे उमेदवार जोमात, जुने जाणते कोमात?

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरभररून यश मिळालं. त्यामुळेच आज योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मात्र या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर समोर आलाय.

Uttar Pradesh : यूपीच भाजपचं यंतिस्तान झिंदाबाद, नवे उमेदवार जोमात, जुने जाणते कोमात?
योगी आदित्यनाथImage Credit source: twitter
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 25, 2022 | 12:08 AM
Share

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भाजपनं (UP elections result 2022) पुन्हा मैदान राखलं, पुन्हा उत्तर प्रदेशात आम्हीच बाहुबली म्हणत, पुन्हा उत्तर प्रदेश काबीज केलं. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरभररून यश मिळालं. त्यामुळेच आज योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत  (yogi adityanath oath ceremony) आहेत. मात्र या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर समोर आलाय. नवनिर्वाचित आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार पहिल्यांदाच निवडून आलले आहेत. अलिकडेच एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे यूपीत भाजपचं (Bjp) यंतिस्तान म्हणजेच तरुण उमेदवारांचं कार्ड चांगलचं चालल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतल आकडेवारीचा अभ्यास केल्यास जातीयवादालाही जास्त थारा मिळाला नसल्याची आकडेवारी समोर आलीय. तसेच महिलांनाही उत्तर प्रदेशातील ही निवडणूक फार मानवलेली नाहीये. आता या निवडणुकीत भाजपचं यंग कार्ड कसं चाललंय हेही पाहुयात…

तरूणांनी विजय खेचून आणला

भाजपने या निवडणुकीत 200 नव्या उमेगवारांना संधी दिली, त्यापैकी 126 जणांचा विजय झाला तर जिंकण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 63 टक्के आहे. समाजवादी पार्टीकडून 199 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यापैकी 56 जणांचा विजय तर  उमेदवार जिंकून येण्याचा सपाचा स्ट्राईक रेट 28.1 टक्के आहे.  बसपानं तब्बल 346 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण जिंकून आला फक्त एकच उमेदवार आला, बसपाचा स्ट्राईक रेट 0.3 टक्के फक्त आहे.  काँग्रेसनं 335 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण एकालाही विजय मिळवता आलं नाही.

पुन्हा संधी मिळालेल्यांची कामगिरी

भाजपने 149 आमदारांना पुन्हा संधी दिली, त्यापैकी 116 जणांचा विजय झाला, जिंकण्याचा स्ट्राईक रेट 77.9 टक्के आहे. सपाने 39 जुने चेहरे पुन्हा रिंगणात उतरवले, त्यापैकी 25 विजय तर  विजयाचा स्ट्राईक रेट 64.8 टक्के आहे. बसपाने तिघांना संधी दिली, पण सगळेच पराभूत झाले. तर काँग्रेसे चौघांना संधी, पण विजय फक्त एकाचाच झाला, जिंकण्याचा स्ट्राईक रेट 25 टक्के आहे.

महिलांसाठी ही निवडणूक कशी राहिली

भाजपकडून 48 महिलांना या निवडणुकीत तिकीट देण्यात आले. त्यातल्या 32 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर विजयाचा स्ट्राईक रेट हा 66 टक्के आहे. सपाने 45 महिलांना संधी दिली होती त्यात 14 महिला विजयी झाल्या आहेत, तर जिंकून येण्याचा स्ट्राईक रेट 31 टक्के आहे. बसपाने 36 महिलांना संधी दिली त्यातल्याली एकही महिला निवडूण आली नाही.काँग्रेसने तर तब्बल 155 महिलांना उमेदवारी दिली मात्र फक्त 1 महिला जिंकून आली.

मुस्लिम उमेवरांच्या पारड्यात काय?

उत्तर प्रदेशात मुस्लिम उमेदावरांच्या पारड्यात फार काही पडलं नाही, हे आकडेवारीवरून दिसून येत. क्वचित एखादा दुसरा उमेदवार निवडणून आल्याचे दिसून येते.

इतर महत्वाच्या बातम्या आणि व्हिडिओ

Breaking : ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता’, नितेश राणेंचा गंभीर आरोप; ‘कलानगर’चाही उल्लेख!

परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांचा तपास CBI कडे जाणार! खासदार Sanjay Raut म्हणतात…

खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं

Follow Us
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल