Uttar Pradesh : OP Rajbhar एनडीएमध्ये कमबॅक करणार? कॅबिनेट मंत्रिपदाच्या चर्चा, अखिलेश यादव यांना मोठा सेटबॅक?

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडलेले ओमप्रकाश राजभर (OP Rajbhar) आता पुन्हा एनडीएमध्ये येण्याची शक्यता निर्माण झालीय.

Uttar Pradesh : OP Rajbhar एनडीएमध्ये कमबॅक करणार? कॅबिनेट मंत्रिपदाच्या चर्चा, अखिलेश यादव यांना मोठा सेटबॅक?
ओपी राजभरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 2:44 PM

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपनं (BJP) पुन्हा विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी झाल्या असल्या भाजपनं बहुमत मिळवलं आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची संधी योगी आदित्यनाथ यांना दिली जाणार आहे. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी 25 मार्चला होण्याची शक्यता आहे. तर, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडलेले ओमप्रकाश राजभर (OP Rajbhar) आता पुन्हा एनडीएमध्ये येण्याची शक्यता निर्माण झालीय. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनं निवडणूक अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात लढवली होती. आता, ते पुन्हा एनडीएत जाणार असल्यानं हा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला धक्का मानला जात आहे. भाजपकडून राजभर यांना मंत्रिपद देखील दिलं जाऊ शकतं.

अमित शाह यांच्याशी भेट झाल्याची चर्चा

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांचे सूर बदलले होते. निवडणुकीच्या प्रचारात ओम प्रकाश राजभर भाजपची सत्ता घालवण्याचं आवाहन करत होते. तर, ओमप्रकाश राजभरयांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला 6 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निवडणूक निकाल भाजपच्या बाजूनं गेल्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याची चर्चा सुरु झालीय. आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि सुनील बन्सल यांच्यासोबत राजभर यांची भेट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.

योगींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?

ओमप्रकाश राजभर यांना योगींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी चर्चा सुरु आहे. राजभर यांच्या पक्षाच्या 6 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळं त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं, अशा चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 18 मार्चला अमित शाह, सुनील बन्सल आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षासोबत युती

विधानसभा निवडणुपूर्वी काही कारणांमुळं ओमप्रकाश राजभर यांनी भाजपशी असणारी युती तोडली होती. यानंतर समाजवादी पार्टीसोबत युती करुन ओमप्रकाश राजभर यांनी निवडणूक लढवली होती. राजभर यांना अपेक्षेप्रमाणं यश मिळालं नाही. अखेर त्यांना 6 जागांवावर यश मिळालं. ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षामुळं समाजवादी पार्टीला पूर्वांचलमध्ये जादा जागा मिळाल्या होत्या.

इतर बातम्या:

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली, Uddhav Thackeray उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील; नितेश राणेंची टीका

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.