मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, दहा मंत्र्यांनी घेतली शपथ
भगवंत मान मंत्रीमंडळाचा शपथविधी

पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजय देशपांडे

|

Mar 19, 2022 | 1:28 PM

चंदीगढ : पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळात एक महिला मंत्र्याला देखील स्थान देण्यात आले आहे. बलजीत कौर यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) नेते हरपाल सिंह चीमा (Harpal Singh Cheema) हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आज हरपाल सिंह चीमा यांच्यासह बलजीत कौर, हरभजन सिंह ईतो, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता भगवंत मान सरकारमधील मंत्रीमंडळाचा आज शपथविधी सोहळा पार पडला.

दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून प्रसिद्ध केली होती. ही यादी प्रसिद्ध करताना भगवंत मान यांनी पंजाबचे नवे मंत्रिमंडळ असे कॅप्शन देखील या यादीला दिले होते. तसेच या सर्वा उमेदवारांचे मान यांनी अभिनंदन देखील केले होते. काँग्रेसला धोबीपछाड देत आप पंजाबमध्ये सत्तेत आले आहे. आपला पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र पिछेहाट झाली. विधानसभेच्या तब्बल 92 जागांवर आपने विजय मिळवला आहे.

‘राज्याच्या विकासाचे उद्दिष्ट’

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या आठवड्यात थोर स्वातंत्र्य सेनानी भगत सिंह यांच्या मूळ गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी बोलताना मान यांनी म्हटले होते की, आम आदमी पार्टीचे हे सरकार सदैव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहील, पंजाबमध्ये विकासाचे एक नवे व्हिजन घेऊन आप कार्य करेल. दरम्यान आज भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

संबंधित बातम्या

भगवंत मान मंत्रीमंडळाचा आज शपथविधी; दहा मंत्री घेणार शपथ, सामान्य चेहऱ्यांना संधी

Corona Update : केरळमध्ये 247 तर महाराष्ट्रात 171 नवे कोरोनाग्रस्त; केंद्राच्या सतर्कतेच्या सूचना

धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें