AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर

तरुण प्रेयसीला मनवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर प्रेयसीसमोर फाशी घेण्याचे नाटक करीत होता. इतक्यात बोलता बोलता त्याच्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला. त्यामुळे फोन पकडण्यासाठी अनावधानाने तो वाकला आणि गळ्यात असलेला फास आवळला जाऊन त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर
बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावरImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 1:31 AM
Share

बिहार : रुसलेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी आत्महत्येचे नाटक (Drama) प्रियकराच्या जीवावर बेतले आहे. या घटनेत प्रियकराला गळफास लागून त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना बिहारमधील पटनामध्ये घडली आहे. याप्रकरणी अथमलगोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तरुणाच्या मृत्यूबाबत अधिक तपास करीत आहेत. मयत तरुणाचा प्रेयसीसोबत काही कारणावरुन वाद झाला होता. त्यामुळे प्रेयसीला मनवण्यासाठी तरुण लाईव्ह फाशीचे नाटक करत होता. याच नाटकामुळे त्याला प्राण गमवावे लागले आहे. (Young man strangled to death in Bihar live hanging drama)

काय घडलं नेमकं ?

पटनाजवळ असलेल्या बरहमधील रुपस गावात रहिवासी असलेला तरुण बुधावारी रात्री जेवण करुन आपल्या रुममध्ये गेला. त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला आणि गप्पा मारत होता. मात्र बोलता बोलता दोघांमध्ये कशावरुन तरी वाद झाला. त्यानंतर तरुणाने प्रेयसीला समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र प्रेयसी ऐकतच नव्हती. त्यामुळे तरुण प्रेयसीला मनवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर प्रेयसीसमोर फाशी घेण्याचे नाटक करीत होता. इतक्यात बोलता बोलता त्याच्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला. त्यामुळे फोन पकडण्यासाठी अनावधानाने तो वाकला आणि गळ्यात असलेला फास आवळला जाऊन त्याचा मृत्यू झाला.

अशी उघड झाली आत्महत्येची बाब

प्रेयसीने तरुणाच्या शेजाऱ्याला फोन करुन घटनेची माहिती दिली. शेजाऱ्याने घरच्यांना येऊन सांगितले. घरच्यांनी मुलाच्या रुममध्ये खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा खरोखर फासावर लटकलेला दिसला. याप्रकरणी तात्काळ अथमलगोला पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कुटुंबीयांकडून माहिती घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Young man strangled to death in Bihar live hanging drama)

इतर बातम्या

Gujrat Drowned Death : गुजरात विविध घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू, अंघोळीसाठी गेले असता घडली घटना

Dhaka Attack : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदू निशाण्यावर; ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.