AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Women Death : बुलढाण्यात शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

लक्ष्मी गुरुवारी कुटुंबियांसोबत स्वतःच्या शेतात हरभरा सोंगण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून ती विहिरीत पडली. तिला तात्काळ विहिरीबाहेर काढून खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Buldhana Women Death : बुलढाण्यात शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
बुलढाण्यात शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 9:23 PM
Share

बुलढाणा : होळी सणानिमित्त सर्वत्र गुरुवारी उत्साहाचे वातावरण होते. होळीच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सगळीकडे सुरु असतानाच खामगाव तालुक्यात सणाला गालबोट लागले आहे. शेतातील विहिरी (Well)वर पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहिते (Married Women)चा विहिरीत पडून मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने शिवारात घडली आहे. लक्ष्मी गजानन राठोड (23) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. होळीच्या दिवशीच विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. (The married woman died after falling into a well in Buldhana)

विवाहितेला रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले

लक्ष्मी गुरुवारी कुटुंबियांसोबत स्वतःच्या शेतात हरभरा सोंगण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून ती विहिरीत पडली. तिला तात्काळ विहिरीबाहेर काढून खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा अपघात आहे की आत्महत्या याबद्दल चर्चा सुरू आहेत. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

नाशिकमध्ये धरणावर धुळवड साजरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू

धरणावर धुळवड खेळायला गेलेल्या महिलेचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तब्बल 2 तासांनंतर स्थानिक पोलोस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. दोन महिला आणि दोन पुरुष नाशिकच्या कश्यपी धरणावर धुळवड खेळायला गेले होते.

पंढरपूरमध्ये विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू

भीमा नदी काठावर विद्युत पंप दुरुस्तीचे काम करत असताना, विजेचा धक्का बसून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही शेतमजुर आहेत. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (The married woman died after falling into a well in Buldhana)

इतर बातम्या

Dhule Crime : धुळ्यात डीजे आवाजावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, सात ते आठ जण गंभीर जखमी

Ulhasnagar Beating : फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.