Dhule Crime : धुळ्यात डीजे आवाजावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, सात ते आठ जण गंभीर जखमी

धुळ्यातील साक्री शहरात धुळवड साजरी होत होती. रंगांची उधळण करीत तरुण मंडळींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. मात्र साक्री शहरातील मध्यवर्ती कॉलनीत तरुण डीजे तालावर नाचत असतानाच दुसऱ्या गटाने येऊन डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावरुन दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली.

Dhule Crime : धुळ्यात डीजे आवाजावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, सात ते आठ जण गंभीर जखमी
धुळ्यात डीजे आवाजावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 8:47 PM

धुळे : सर्वत्र आज धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना धुळ्यात या आनंदाला गालबोट लागले आहे. धुलीवंदन निमित्त डीजे लावून नाचत असताना डीजेच्या आवाजावरून दोन गटात तुंबळ हाणामारी (Fighting) झाल्याची घटना साक्री शहरातील मध्यवर्ती कॉलनी परिसरात घडली आहे. या हाणामारीत सात ते आठ जण गंभीर जखमी (Injuried) झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (In Dhule, two groups clashed over the sound of a DJ, major injuring seven to eight people)

दोन्ही गटाकडून धारदार शस्त्राने एकमेकांवर वार

धुळ्यातील साक्री शहरात धुळवड साजरी होत होती. रंगांची उधळण करीत तरुण मंडळींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. मात्र साक्री शहरातील मध्यवर्ती कॉलनीत तरुण डीजे तालावर नाचत असतानाच दुसऱ्या गटाने येऊन डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावरुन दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन गटात आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटाकडून धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या दिलेल्या माहितीनुसार सात ते आठ जण या प्रकरणात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींमध्ये महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान मारामारी

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत अनेकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. दोन चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली आहे. या प्रकरणी अद्याप शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कुटुंबाने केला आहे. (In Dhule, two groups clashed over the sound of a DJ, major injuring seven to eight people)

इतर बातम्या

Ulhasnagar Beating : फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime| इंदापूर पोलिसांची कामगिरी ! 20 लाखांच्याअवैद्य गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.