Gujrat Drowned Death : गुजरात विविध घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू, अंघोळीसाठी गेले असता घडली घटना

देवभूमी द्वारकामध्ये पाच जण, खेडामध्ये दोन जण आणि महिसागर जिल्ह्यात चार जणांचा धुळवडीनिमित्त नदी आणि तलावात आंघोळीसाठी गेले असताना 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Gujrat Drowned Death : गुजरात विविध घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू, अंघोळीसाठी गेले असता घडली घटना
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 12:30 AM

गुजरात : देशात धुळवडीची धूम सुरु असतानाच गुजरातमध्ये धुलिवंदनाच्या सणाला गालबोट लागले आहे. राज्यात विविध ठिकाणी रंगपंचनीच्या दिवशी 11 जणांचा बुडून (Drowned) मृत्यू (Death) झाला आहे. मृतांमध्ये 7 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. देवभूमी द्वारकामध्ये पाच जण, खेडामध्ये दोन जण आणि महिसागर जिल्ह्यात चार जणांचा धुळवडीनिमित्त नदी आणि तलावात आंघोळीसाठी गेले असताना 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. (In Gujarat, 11 people drowned in various incidents)

द्वारकामध्ये पाच जणांचा मृत्यू

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, देवभूमी द्वारका येथे धुळवड साजरी करण्यासाठी अंघोळीसाठी गेलेल्या पाच जणांचा त्रिवेणी नदीत बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाच जण बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जीत लुहार (16), हिमांशू राठोड (17), भूपने बगडा (16), धवल चांदेग्रा (16) आणि हितार्थ गोस्वामी (16) अशी या पाच जणांची नावे आहेत. हे सर्व जण येथील स्थानिक आहेत.

खेडामध्ये दोघांचा मृत्यू

खेडा जिल्ह्यातील वासो तालुक्यातील जरोल गावात धुळवडीनिमित्त दोन अल्पवयीन मुले अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे भानवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निकुंज जोशी यांनी सांगितले. हे दोघेही जरोल गावाजवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. प्रितेश सोलंकी (15) आणि सागर सोलंकी (14) अशी मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. दोघेही जरोल गावचे रहिवासी होते. भानवड व खंबालिया येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

महिसागरमध्ये चौघांचा बुडून मृत्यू

महिसागर जिल्ह्यातही वांकबोरी धरणातील महिसागर नदीत बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चौघांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाजवळ आयोजित जत्रेत सहभागी झाल्यानंतर हे लोक नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. तेथून जाणाऱ्या लोकांनी हे तरुण बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत तासाभराच्या अथक परिश्रमानंतर हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. (In Gujarat, 11 people drowned in various incidents)

इतर बातम्या

Dhaka Attack : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदू निशाण्यावर; ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला

Buldhana Women Death : बुलढाण्यात शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.