AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhaka Attack : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदू निशाण्यावर; ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला

तब्बल 150 ते 200 कट्टरतावाद्यांच्या जमावाने ढाका शहरातील इस्कॉन (ISKON) राधाकांता मंदिरात घुसखोरी केली आणि तेथील सामानाची लूटमार करीत प्रचंड तोडफोड केली. या घटनेने हिंदू धर्मियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी भाविकांच्या सामानाची लूट केली.

Dhaka Attack : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदू निशाण्यावर; ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला
ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 10:38 PM
Share

ढाका : बांगलादेशमध्ये हिंदूविरोधातील आकस अधूनमधून बाहेर पडत आहे. बांगलादेशच्या सरकारने सुरक्षेबाबत आश्वासन देऊनही गुरुवारी रात्री पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरावर हल्ल्या (Attack)ची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 150 ते 200 कट्टरतावाद्यांच्या जमावाने ढाका शहरातील इस्कॉन (ISKON) राधाकांता मंदिरात घुसखोरी केली आणि तेथील सामानाची लूटमार करीत प्रचंड तोडफोड केली. या घटनेने हिंदू धर्मियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी भाविकांच्या सामानाची लूट केली. रात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी हा हैदोस घातल्याने प्रचंड खळबळ उडाली. हल्ल्यात अनेक हिंदू भाविक जखमी झाले. हिंदुस्थानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. (Attack on ISKCON temple in Dhaka, Bangladesh)

वारी परिसरातील मंदिरावर हल्ला

वारी परिसरातील 222 लाल मोहन साहा स्ट्रीटवर उभारलेल्या मंदिरावर हा हल्ला झाला. गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हाजी सैफुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोक इस्कॉन राधाकांता मंदिरात घुसले. त्यांनी भाविकांना बाजूला ढकलून देत मंदिराची तोडफोड तसेच इतर मौल्यवान सामानाची लूटालूट सुरू केली. हल्लेखोरांच्या जमावाने भाविकांना मारहाणही केली. त्यात अनेकांना दुखापत झाली आहे.

होळीच्या एक दिवस आधी हा हल्ला झाल्याने हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. हा हल्ला गंभीर चिंतेचा विषय असून बांगलादेश सरकारने हिंदूंना सुरक्षा पुरवावी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले की, ढाका येथील उच्चायुक्त तिथल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

यापूर्वीही मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना

बांगलादेशातील हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात काही दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. त्यावेळी अनेक मंदिरांवरही हल्ले झाले. त्या हिंसाचारात 2 हिंदूंसह 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या एका संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या 9 वर्षांत बांगलादेशातील हिंदूंवर जवळपास 4000 हल्ले झाले आहेत. बांगलादेशची लोकसंख्या 16.5 कोटी असून त्यात 9 टक्के हिंदू आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत येथील हिंदू आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले वाढले आहेत. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात अनेक मंदिरांवर हल्ले केले गेले होते. त्यावेळीही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता. (Attack on ISKCON temple in Dhaka, Bangladesh)

इतर बातम्या

तब्बल 18 दिवसांनी त्याचं पार्थिव भारतात येणार, युक्रेन युद्धात भारतीयांच्या जखमा भेगाळल्या

Kashmir filesमधील तथ्य चुकीची, मुस्लिम आणि शिखांचं बलिदान विसरले; ओमर अब्दुल्ला कडाडले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.