भगवंत मान मंत्रीमंडळाचा आज शपथविधी; दहा मंत्री घेणार शपथ, सामान्य चेहऱ्यांना संधी

भगवंत मान मंत्रीमंडळाचा आज शपथविधी; दहा मंत्री घेणार शपथ, सामान्य चेहऱ्यांना संधी
भगवंत मान
Image Credit source: tv9

आज अकरा वाजता भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. यावेळी एकूण दहा मंत्री शपथ घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार असून, त्यानंतर साडेबारा वाजता कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे.

अजय देशपांडे

|

Mar 19, 2022 | 8:58 AM

चंदीगढ : पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला धोबीपछाड देत आप स्वबळावर सत्तेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच आपचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मान यांनी थोर स्वातंत्र्य सौनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सोहळ्याला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देखील उपस्थित होते. त्यावेळी भगवंत मान यांनी एकट्यानेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नव्हता. दरम्यान आज अकरा वाजता भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. यावेळी एकूण दहा मंत्री शपथ घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार असून, त्यानंतर साडेबारा वाजता कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे.

भगवंत मान मंत्रीमंडळात यांचा समावेश

  1. लालचंद कटारुचक – लालचंज कटारुचक हे भोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. संवेदनशील मतदारसंघ म्हणून भोवा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. कटारुचक यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून, त्यांच्या नावावर कुठलीही अचल संपत्ती नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
  2. डॉक्टर विजय सिंगला – विजय सिंगला हे पेशाने डॉक्टर असून, ते मानसा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 63 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
  3. कुलदीप सिंह – कुलदीप सिंह हे अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हर प्रतापसिंह यांचा पराभव केला. कुलदीप सिंह यांचा व्यवसाय शेती असून, ते गावचे सरपंच देखील होते. त्यांचा भाऊ काँग्रेसमध्ये आहे.
  4.  हरभजन सिंह – हरभजन सिंह हे जंडीयाला विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते 25 हजार मताधिक्याने विजयी झाले.
  5. डॉ. बलजीत कौर – डॉ. बलजीत कौर या भगवंत मान मंत्रीमंडळातील एकमेव महिला मंत्री असणार आहेत. त्यांनी अकाली दलाच्या उमेदवाराचा तब्बल 40 हजार मतांनी पराभव केला. बलजीत कौर या पेशाने नेत्र रोग तज्ज्ञ आहेत.
  6.  हरपाल सिंह चिमा – हरपाल सिंह चिमा हे यापूर्वी विरोधी पक्षनेते होते. ते संगरूर जिल्ह्यातील दिडबा मतदारसंघातून विजयी झाले आहे. 47 वर्षीय चिमा पेशाने वकील आहेत
  7.  गुरमीत सिंह मित – गुरमीत सिंह मित हे बरनाला मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी 37 हजार मतांनी शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
  8.  लालजित सिंह भुल्लर – लालजित सिंह हे पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे.
  9. ब्रम्ह शंकर शर्मा – ब्रम्ह शंकर शर्मा हे होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले असून, त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
  10. हरज्योत सिंह – हरज्योत सिंह हे आनंदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, ते पेशाने वकील आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें