भगवंत मान बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, भगत सिंहांच्या गावात शपथविधी

भगवंत मान बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, भगत सिंहांच्या गावात शपथविधी
भगवंत मान

पंजाबला (Punjab)अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आज आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 16, 2022 | 2:13 PM

चंदीगढ : पंजाबला (Punjab)अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आज आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. थोर स्वातंत्र्य सौनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपच्या अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबच्या इतिहासामध्ये प्रथमच पारंपरिक पक्षांना सोडून एक नवा पक्ष सत्तेत आला आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेमध्ये देखील मान यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. अखेर आज भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खटकर कलां गावात शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काय म्हणाले मान?

भगवंत मान यांचा शपथविधी स्वातंत्र सैनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात झाला. यावेळी बोलताना भगवंत मान यांनी म्हटले की, खटकर कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला एक खास कारण आहे. हे गाव भगत सिंह यांचे गाव आहे. अनेकजण राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात. मात्र आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.

पंजाबमध्ये आपला बहुमत

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल नुकतेच काही दिवसांपूर्वी लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवले. पंजाबमध्ये आपचे तब्बल 92 आमदार निवडून आले आहेत. पंजाबच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाला एवढे बहुमत मिळाले. अखेर आज आपचे भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

संबंधित बातम्या

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

VIDEO | अनाथ मुलांवर रंगांची बरसात, बीडच्या आमदारांचा अनोखा वाढदिवस, ‘झिंगाट’ने उत्साहाला उधाण!

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें