AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा

पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते.

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा
सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2022 | 1:08 PM
Share

चंदीगड: पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची जशी इच्छा होती तेच मी केलंय, असं ट्विट करत सिद्धू यांनी आपलं राजीनामा पत्रंही पोस्ट केलं आहे. सिद्धूंना गेल्यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सिद्धू यांनी सातत्याने आपल्याच पक्षावर हल्लाबोल सुरू ठेवला होता. त्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली होती. मात्र, त्यांची ही खेळी काही यशस्वी झाली नाही. चन्नी यांना दोन्ही मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

काँग्रेसला केवळ 17 जागा

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला आहे. 92 आमदार निवडून आणण्याची किमया आपनं पंजाबमध्ये करुन दाखवली आहे. तर काँग्रेसला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी असलेल्या या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी पंजाबमध्ये विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंजाबमधील जनतेचे आभार मानताना भगवंत मान यांनी महत्त्वाची घोषणा केली. 122 लोकांची सुरक्षा कमी केल्यामुळे 403 पोलिसांसह 27 पोलिस वाहनं आता पुन्हा एकदा पोलिस स्थानकात परतली असल्याची माहिती भगवंत मान यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

शरद पवार-संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं खलबतं, चर्चा गुलदस्त्यात

VIDEO: G-23 म्हणजे काँग्रेसचे सडके कांदे, संजय राऊत आता राहुल गांधींची भाषा बोलतायत?

VIDEO: पंतप्रधान ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारक, सिनेमाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवला जातोय, संजय राऊतांची खोचक टीका

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.