VIDEO | अनाथ मुलांवर रंगांची बरसात, बीडमध्ये आमदाराचा अनोखा वाढदिवस, ‘झिंगाट’ने उत्साहाला उधाण!

VIDEO | अनाथ मुलांवर रंगांची बरसात, बीडमध्ये आमदाराचा अनोखा वाढदिवस, 'झिंगाट'ने उत्साहाला उधाण!
आमदार तानाजी सावंत यांचा वाढदिवस पसायदान अनाथालयात साजरा
Image Credit source: TV9 Marathi

बीडमध्ये राजकीय नेत्याचा वाढदिवस (Beed political) जल्लोषात साजरा करण्याची पद्धत आहे. अनेकदा यात बडेजावपणा येतो तर तलवारीने केक कापण्यापर्यंत विकृतींचे दर्शन घडते. मात्र या प्रथांना फाटा देत बीडचे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन यांनी आपल्या नेत्याचा वाढवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केलाय.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 16, 2022 | 4:00 PM

बीड : बीडमध्ये राजकीय नेत्याचा वाढदिवस (Beed political) जल्लोषात साजरा करण्याची पद्धत आहे. अनेकदा यात बडेजावपणा येतो तर तलवारीने केक कापण्यापर्यंत विकृतींचे दर्शन घडते. मात्र या प्रथांना फाटा देत बीडचे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन यांनी आपल्या नेत्याचा वाढवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये सध्या सेवा सप्ताह सुरु आहे. याच दरम्यान त्यांचे कार्यकर्ते आणि अशोक रोमन यांनी बीडजवळील ढेकनमोहा इथल्या पसायदान (Pasaydaan) अनाथालयाला भेट दिली. येथील मुलांसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच मुलांसोबत अतिशय उत्साहात सर्व कार्यकर्त्यांनी होळी साजरी केली. यावेळी मुलांच्याही आनंदाला उधाण आले होते.

Beed Birthday

पसायदान अनाथलायातील मुलांना तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पिचकाऱ्या ,रंग आणि मिठाईचे वाटप केले.

Beed Birthday

मुलांसोबत लहान होऊन या कार्यकर्त्यांनी होळीचा आनंद साजरा केला. बीडमध्ये कार्यकर्त्यांनी या मुलांसोबत उत्साहात होळी खेळली. तसेच मुलांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सही केला. सलग दोन वर्ष कोरोनामुळे या मुलांनी होळी साजरी केली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर मुलांना अशा प्रकारे होळी साजरी करता आली. त्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

इतर बातम्या-

Agricultural : शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतकरी आत्मनिर्भरतेसाठी सरकारचे काय आहे धोरण?

नागपुरातील दोघे मित्र दारू पित बसले, झिंग चढल्यानंतर वाद झाला, त्यात एक जिवानीशीचं गेला!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें