AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरातील दोघे मित्र दारू पित बसले, झिंग चढल्यानंतर वाद झाला, त्यात एक जिवानीशीचं गेला!

नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. विक्रांत बंडगर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विक्रांतची हत्या त्याच्याच मित्राने केली आहे. गणेश शालीकराम बेडेवार असे आरोपीचे नाव आहे.

नागपुरातील दोघे मित्र दारू पित बसले, झिंग चढल्यानंतर वाद झाला, त्यात एक जिवानीशीचं गेला!
नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत खुनाची घटना घडली.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 1:31 PM
Share

नागपूर : मृतक विक्रांत बंडगर आणि आरोपी गणेश बेडेवार हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे (Both have criminal tendencies) आहेत. काल दोघेही एकत्र दारू पित बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद (disputes between the two) निर्माण झाला. विक्रांतच्या टोचून बोलण्यावरून संतापलेल्या गणेशने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने विक्रांतच्या गळ्यावर वार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने दगडाने हल्ला चढवला होता. विक्रांत रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी (Kalmana police) घटनास्थळ गाठले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विक्रांतची हत्या झाल्यानंतर कळमना परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागपूर पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

आरोपीला अटक

तपास सुरू होताच पोलिसांनी आरोपी गण्या उर्फ गणेशला तात्काळ अटक केली. आरोपी पोलिसांच्या हाती लागला तेव्हा तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती कळमना ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात नागपुरात एकही हत्या झाली नव्हती. मात्र मार्च महिन्यात पुन्हा हत्यासत्र सुरू झालं. शुल्लक कारणावरून ही हत्या झाली.

अशी घडली घटना

गणेश बेडेवार हा ऑटोचालक आहे. तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. मृतक विक्रांत हासुद्धा गुन्हेदारी प्रवृत्तीचाच होता. त्याच्यावरही हल्ला विनयभंग, हल्ला तसेच चोरीचा गुन्हा दाखल होता. दोघेही जयप्रकाशनगरात राहायचे. ओळख असल्याने ते सोबत बसायचे. काल दुपारी गोपालनगरात दोघेही सोबत दारू पित बसले होते. विक्रांतने गणेशला तेरे भांजे का मर्डर हो गया, तुने क्या किया, म्हणून हिनवले. त्यावरून दोघांचा वाद झाला. यात गणेशने विक्रांतला चाकूने भोसकले.

Photo – नागपूरकरांच्या सेवेत स्कायलिफ्ट दाखल, उंचीवर अडकलेल्यांनाही काढता येणार बाहेर

नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरेंची सायकलवारी, व्यायाम आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा मेळ

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.