Holi 2022 : रंगपंचमीला हा ‘ट्रेंडी आउटफिट’ लूक नक्की ट्राय करा

रंगपंचमीची उत्सूकता व उत्साह शिगेला पोहचला आहे. प्रत्येक जण आपआपल्या पध्दतीने होळी व रंगपंचमीचे नियोजन करत आहे. यात साहजिकच एक नियोजन येते ते म्हणजे, रंगपंचमीला कुठला आउटफिट घालावा? याबाबतच या लेखात आम्ही काही पर्याय उपलब्ध करुन देत आहोत.

Holi 2022 : रंगपंचमीला हा ‘ट्रेंडी आउटफिट’ लूक नक्की ट्राय करा
holi Trendy outfit
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 12:39 PM

रंगपंचमीच्या निमित्ताने अनेकजण नाच-गाणे तसेच विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात. या उत्सवात आपण प्रत्येकाचे लक्ष स्वत:कडे आकर्षित करावे असे प्रत्येकाला वाटत असते. जर तुम्हालाही स्टायलिश (stylish) दिसायचे असेल तर तुम्ही काही ‘ट्रेंडी आउटफिट्स’(Trendy Outfit) देखील ट्राय करू शकता. यंदा रंगपंचमी 18 मार्चला साजरी होत आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात, नाचतात आणि विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात. बरेच लोक या दिवशी पार्टीचेही (Holi party) आयोजन करतात. त्यामुळे या दिवशी आपण चांगले व सर्वात उठून दिसावे असे प्रत्येकाला वाटत असणे स्वाभाविकच आहे. रंगपंचमीच्या दिवशी पारंपारिक कपड्यांव्यतिरिक्त कुठला पर्याय अधिक चांगला आहे, यांची अनेकांकडून चाचपणी केली जात असते. आज आम्ही तुमच्यासमोर असेच काही ‘ट्रेंडी लूक’ सूचवत आहोत.

निळ्या जीन्ससह पांढरा कुर्ता

महिलांना पारंपारिकपणे होळीच्या वेळी पांढरा कुर्ता घालता येतो. तुम्ही निळ्या जीन्ससोबत त्याला पेअर करू शकता. यामुळे तुम्हाला इंडो-वेस्टर्न लुक मिळेल. यासोबत तुम्ही त्यासोबत लांब कानातले आणि सनग्लासेस घालू शकता.

शर्ट ड्रेस

कंफर्ट राहण्यासाठी या दिवशी तुम्ही शर्ट ड्रेस देखील घालू शकता. तुम्ही मोठ्या आकाराचा शर्ट ड्रेस घालू शकता. या लुकसाठी तुमच्या ड्रेससोबत ब्राऊन बेल्ट आणि पांढरे स्नीकर्स घाला. स्टड इअररिंग्स आणि सनग्लासेससह तुम्ही अधिक छान दिसाल.

बाइकर शॉर्ट्स

बाइकर शॉर्ट्समध्ये तुम्हाला खूप कंफर्ट वाटेल. तसेच ते तुम्हाला स्टायलिश लुक देईल. बाइकर शॉर्ट्ससह टाय डाय टी-शर्ट शोभून दिसेल. टॉप स्नीकर्ससह ते परिधान करा. सनग्लासेसने लूक चांगला दिसेल.

चमकदार ब्लाउजसह ऑफ व्हाइट साडी

चमकदार रंगाच्या ब्लाउजसह क्लासिक ऑफ व्हाइट साडीचा विचार करता येईल. यामध्ये तुम्ही केस मोकळे ठेवा किंवा केसांचा बन केला तरी चालेल. ऑक्सिडाइज्ड इअररिंगसह हा आउटफिट चांगला दिसेल.

शरारासह क्रॉप टॉप

रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही शरारासोबत क्रॉप टॉप घालू शकता. हे तुम्हाला इथनिक लुक देईल. मॅचिंग क्रॉप टॉपसह पांढरा शरारा घाला. त्यासोबत शूज आणि कानातले घाला. रंगपंचमीसाठी हा परफेक्ट लुक आहे. या आउटफिट्समध्ये तुमची छायाचित्रे देखील खूप सुंदर दिसतील.

…म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, ‘या’ माणसाची कशी अवस्था झाली? पाहा ‘हा’ Viral video

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

सहकार क्षेत्राला ‘संजीवनी’ देणारा महर्षी हरपला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.