UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?

लखीमपूर (Lakhimpur), हाथरस आणि उन्नाव सारख्या घटनांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अत्यंत संवेदनशील मानल्या गेलेल्या या जिल्ह्यांत कोण निवडून आलं हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:09 PM

लखनौः उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Assembly Elections) पुन्हा एकदा योगी आदित्य नाथ (Yogi Adityanath) यांचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यात भाजप प्रचंड बहुमताने निवडून आले असून समाजवादी पार्टीचा मोठा अपेक्षाभंग झालाय. तर काँग्रेस गिनतीतच नाही, अशी स्थिती आहे. उत्तर प्रदेशात मागील पाच वर्षात ज्या घटना घडल्या, त्यानंतर इथले भाजप सरकार टिकेल की नाही, असा प्रश्न होता. लखीमपूर (Lakhimpur), हाथरस आणि उन्नाव सारख्या घटनांनी सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. खून, बलात्कार, हिंसाचााच्या घटनांमुळे अतिसंवेदनशील बनलेल्या या जिल्ह्यांमध्ये  भाजप मोठ्या फरकाने विजयी झाले आहे. त्यामुळे अशा घटनांचा मतदानावर परिणाम दिसून आला नाही, असा सूर निघतोय. उत्तर प्रदेशातल्या संवेदनशील  मानल्या जाणाऱ्या लखीमपूर, हाथरस आणि उन्नाव आदी ठिकाणी कोण निवडून आलं हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

  1.  उन्नाव- भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना येथे घडली होती. यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेश सरकारवर नामुष्की ओढवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीवर याचा काहीच परिणाम झाला नाही. उन्नाव येथून भाजपचे पंकज गुप्ता हे जिंकले असून समाजवादी पार्टीचे अभिनव कुमार यांना हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे कुलदीप संगर यांची आई काँग्रेसकडून लढत होती, त्यांचाही यात पराभव झाला. उन्नावमधील एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. या सर्व ठिकाणी भाजपाचा विजय झाला आहे.
  2. हाथरस- इथलं बलात्कार प्रकरणही योगी सरकारसाठी आव्हानात्मक ठरलं. पण निवडणुकांवर याचा परिणाम दिसून आला नाही. भाजपच्या उमेदवार अंजुला सिंह महौर खूप मोठ्या फरकाने येथे निवडून आल्या. येथील बसपाचे संजीव कुमार दुसऱ्या स्थानी तर सपाचे उमेदवार ब्रजमोहन राही हे तिसऱ्या स्थानी आहेत.
  3. लखीमपूर- शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप नेता अजय मिश्रा टेनी यांच्या पुत्राने शेतकऱ्यांवर ट्रॅक्टर चालवले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. मात्र लखीमपूर येथेही भाजपचे योगेश वर्मा जिंकले असून सपाचे उत्कर्ष वर्मा यांना पराभव पत्करावा लागला.
  4. मुजफ्फरनगर- येथील शामली, बागपत जिल्ह्यांतील शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनात उतरले होते. मुजफ्फरनगर येथील 12 पैकी 3 जागांवर भाजप निवडून आले.
  5. कैराना- उत्तर प्रदेशातील हॉट सीटपैकी एक कैरानादेखील आहे. येथील जागेवर सपाच्या नेत्याने भाजपाच्या उमेदवाराला हरवले. सपाचे उमेदवार नाहिद हसन यांनी भाजपच्या मृगांका सिंह यांचा पराभव केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल काय?

भाजप- 255 सपा- 111 इतर – 34 काँग्रेस- 2 बसपा- 1 एकूण जागा- 403

इतर बातम्या-

हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे शेतीव्यवसायात अमूलाग्र बदल, सिंचनाचा प्रश्न मार्गी अणखी बरेच काही

भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.