पुन्हा योगी विराजमान होण्याची तारीख ठरली, शपथविधीचा प्लॅन काय? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशात योगी कोणत्या तारखेला सरकार स्थापन करतील, यांच्या संभाव्य तारखाही समोर आल्या आहे. एक वृत्तवाहिनीने 25 मार्चला योगींचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी (Yogi Adityanath Oath ceremony) होणार असल्याची माहितीही सुत्रांच्या हवाल्याने दिलीय.

पुन्हा योगी विराजमान होण्याची तारीख ठरली, शपथविधीचा प्लॅन काय? वाचा सविस्तर
योगींच्या शपथविधीची तारीख ठरलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:54 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केलीय. आता वेध लागलेत उत्तर प्रदेशात पुन्हा सरकार स्थापन करण्याचे, उत्तर प्रदेशात योगी कोणत्या तारखेला सरकार स्थापन करतील, यांच्या संभाव्य तारखाही समोर आल्या आहे. एक वृत्तवाहिनीने 25 मार्चला योगींचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी (Yogi Adityanath Oath ceremony) होणार असल्याची माहितीही सुत्रांच्या हवाल्याने दिलीय. योगी आदित्यनाथ मीडिया रिपोर्ट्सनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Modi), गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अनेक केंद्रीय कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी लखनऊ येथील एकना स्टेडियममध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

शपविधीला कुणाला बोलवणार?

शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यात बसपा प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांची नावं आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही निमंत्रण असल्याची माहिती समोर येत आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवले आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले की 37 वर्षांनंतर प्रथमच सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. भाजपच्या या मोठ्या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्याची औपचारिकता सुरू झाली आहे. यामुळे त्यांनी देशाची राजधानी दिल्लीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोनदा चर्चा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेले आदित्यनाथ यांनी पक्षनेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान सरकार स्थापनेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक मंत्र्यांचा पराभव झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली गाठली होती. 403 सदस्यांच्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या आहेत आणि त्यांच्या दोन मित्रपक्षांनी 18 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे निर्विवाद भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.

ओवेसींची एमआयएम भाजपची ‘बी’ टीम सिद्ध होतेय का, यूपीतल्या ह्या जागांवरचे निकाल तरी बघा…!

कोण आहेत पल्लवी पटेल, ज्यांनी मोदी-योगीच्या लाटेतही उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा पराभव केला?

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.