AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : तिसरा सामना, तिसरं शतक? विराटला वर्ल्ड रेकॉर्डसह 3 विक्रम करण्याची संधी

IND vs SA Odi Series 2025 : विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची आणि रायपूरमध्ये शतक झळकावलं. आता विराटकडे विशाखापट्टणममध्ये शतकी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तसेच विराटच्या निशाण्यावर आणखी काही विक्रम आहेत. जाणून घ्या.

Virat Kohli : तिसरा सामना, तिसरं शतक? विराटला वर्ल्ड रेकॉर्डसह 3 विक्रम करण्याची संधी
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 05, 2025 | 11:02 PM
Share

टीम इंडिया केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताचा रायपूरमध्ये हिशोब केला आणि मालिका बरोबरीत आणली. आता अंतिम सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच भारतीय चाहत्यांचं विराट कोहली याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

विराटकडे 3 विक्रम करण्याची संधी

विराट कोहली याने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात धमाका केला. विराटने सलग दोन्ही सामन्यात शतक झळकावलं. विराट यासह या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने 2 सामन्यांमध्ये 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. विराटने या सलग 2 शतकांसह रायपूरमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यानंतर आता विराटला अंतिम सामन्यात 3 विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

विराटला शतकांच्या हॅटट्रिकसह वर्ल्ड रेकॉर्ड बरोबरीची संध

आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 12 फलंदाजांनी सलग 3 शतकं झळकावली आहेत. या 12 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. तर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याने 2 वेळा सलग 3 शतकं करण्याची लगावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटकडे सलग दुसऱ्यांदा 3 शतकं लगावून बाबर आझम याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग शतकी चौकार?

विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात अनुक्रमे 135 आणि 102 अशा धावा केल्या. विराट त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळला होता. विराटने तेव्हाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. त्यामुळे विराटकडे विशाखापट्टणममध्ये शतक करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौकार लगावण्यात संधी आहे. विराटने असं केल्यास तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 4 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरेल.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

विराट सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटला दुसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकारा याला पछाडण्यासाठी फक्त 107 धावांची गरज आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.