भाजपकडे 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर पुढील वर्ष महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा लोबो यांनी केलाय.
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) आज दुसऱ्यांदा शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेत आहेत. गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. यावेळी सावंत यांच्यासह आठ मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले आहेत. भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अजूनही गोव्यातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.
निवडणूक निकाल लागून दहा दिवस झाल्यावर अखेर गोव्यात भाजपला सरकार स्थापनेचा मुहूर्त सापडला आहे. येत्या बुधवार किंवा गुरुवारी गोव्यात नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. येत्या 23 किंवा 24 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता विश्वजीत राणे पत्रकारांवरच भडकले. असले फालतू प्रश्न मला विचारू नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेत्यांना विचारा अशा शब्दांत विश्वजीत राणे यांनी आपली नाराजी पत्रकारांपुढे व्यक्त केली.
Who Will be Goa CM : गोव्यात प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष काही लपून राहिलेला नाही. अशातच आता गोव्यातील मुख्यमंत्री पदाबाबत बंड शमणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमित शहा यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Utpal Parrikar : गोव्यात भाजपनं 2022च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता कायम राखत 20 जागांवर दणदणित विजय मिळवलाय. तर आपचे दोन उमेदवार गोव्यात निवडून आलेत.
गोव्यात नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसतोय.
गोव्यातून मोठी बातमी समोर येत असून विश्वजीत राणे यांनी राजभवनात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आहे. विश्वजित राणे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात असल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.