Goa CM Oath Taking Ceremony: गोंय सरकार शपथविधी सुवाळो, मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री शपथ घेणार, दोन हजार पोलीस तैनात, तटरक्षक दल अॅलर्ट
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) आज दुसऱ्यांदा शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेत आहेत. गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. यावेळी सावंत यांच्यासह आठ मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
![Goa CM Oath Taking Ceremony: गोंय सरकार शपथविधी सुवाळो, मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री शपथ घेणार, दोन हजार पोलीस तैनात, तटरक्षक दल अॅलर्ट Goa CM Oath Taking Ceremony: गोंय सरकार शपथविधी सुवाळो, मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री शपथ घेणार, दोन हजार पोलीस तैनात, तटरक्षक दल अॅलर्ट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28162729/New-Project-70.jpg?w=1280)
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) आज दुसऱ्यांदा शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेत आहेत. गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. यावेळी सावंत यांच्यासह आठ मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Miniter Amit Shah) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या शपथविधी सोहळ्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. या सोहळ्याला व्हीव्हीआयपी गेस्ट येणार असल्याने तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विशेष दलाचा फौजफाटाही यावेळी तैनात करण्यात आला आहे. याशिवाय तटरक्षक दलालाही अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्टेडियममध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
![Goa CM Oath Taking Ceremony](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28161854/New-Project-66.jpg)
Goa CM Oath Taking Ceremony
शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी घरात पूजा अर्चा केली. प्रमोद सावंत यांनी मनोभावे कुलदैवतेला साकडे घातले. त्यानंतर ते शपथविधीसाठी घराबाहेर पडले.
![Goa CM Oath Taking Ceremony](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28161945/New-Project-67.jpg)
Goa CM Oath Taking Ceremony
प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला आहे. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं आहे. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो आहोत.
![Goa CM Oath Taking Ceremony](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28162017/New-Project-65.jpg)
Goa CM Oath Taking Ceremony
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सीटी रवी यांनी कालच श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जाऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली होती. तसेच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तयारीच्या अनुषंगाने काही सूचनाही दिल्या होत्या.
![Goa CM Oath Taking Ceremony](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28162214/Goa-CM-Oath-Taking-Ceremony.jpg)
Goa CM Oath Taking Ceremony
प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर त्यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदी नेते पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![Goa CM Oath Taking Ceremony](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/28162048/New-Project-68.jpg)
Goa CM Oath Taking Ceremony
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील 15 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या स्टेडियम परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Goa | CM designate Pramod Sawant today handed over the order for appointing Council of Ministers to Goa Governor at Raj Bhavan
Vishwajeet Rane, Mauvin Godinho, Ravi Naik, Nilesh Cabral, Subhash Shirodkar, Rohan Khaunte, Atanasio Monserrate &Govind Gaude to take oath as ministers pic.twitter.com/2jO7X1AV56
— ANI (@ANI) March 28, 2022
संबंधित बातम्या:
देशातील किमान 10 राज्यांत हिंदू ‘अल्पसंख्याक’ ठरणार; केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली ‘ही’ माहिती