AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आज प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. तर प्रमोद सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ मिळणार, किती पाहून उपस्थित असणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?
प्रमोद सावंतImage Credit source: ANI
| Updated on: Mar 28, 2022 | 6:37 AM
Share

मुंबई : नुकताच उत्तर प्रदेशातील शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचप्रकारे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे देखील दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे आज देशभराचं लक्ष असणार आहे. कारण, गोव्याच्या 40 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसला एकत्र घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केला. त्याविषयी शिवसेना नेते संजय राऊतांनी अनेकदा बोलूनही दाखवलं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून आलं. यामुळे गोव्याच्या शपथविधीकडे देशभराचं लक्ष असणार आहे.

कसं असणार मंत्रिमंडळ?

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची प्रमोद सावंत दुसऱ्यांदा शपथ घेतील. डॉ. शामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद सावंत शपथविधी सोहळा पार पडेल. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात 11 नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची सूत्रांची माहिती आहे. तर या शपथविधीला सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, उद्योजकांची उपस्थिती असण्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

अखेर रस्सीखेच थांबली!

गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन रच्चीखेच सुरु असल्याचं यापूर्वी अनेकदा बोललं गेलं. गोव्याच्या राजकारणात त्यामुळे एकदा चढाओढही पाहायला मिळाली होती. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेलीय. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता. मात्र, प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यानं अखेर मुख्यमंत्रीपदी सुरू असलेली रस्सीखेच थांबली.

भाजपचं पारडं जड

गोव्यात भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलेलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे.

इतर बातम्या

Pune| अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर

माजी नगरसेवक Nitish Gwalwanshi यांचा काँग्रेसला हात, नितीन गडकरींच्या घरी भाजपात प्रवेश

पडळकरांचा गनिमी कावा, एकदा नाही, दोनदा नाही, पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, सरकार बघत राहिलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.