Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. पण, दुसरी चिंता वाढविणारी बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाने नागपूर शहरात चार बळी घेतले. गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा कोरोनाने जीव गेला. तर 27 पोलिसांनाही कोरोनाचे संक्रमण झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली.

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?
प्रातिनिधीक फोटो

नागपूर : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून डिसेंबरअखेपर्यंत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोनाच्या दैनंदिन बाधितांसोबतच मृतांमध्येही टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. हे मृत्यूचे सत्रही गेल्या दोन-तीन दिवसांपासून कायम आहे. त्यामुळं प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली. शुक्रवार, 14 जानेवारी रोजी जिल्ह्यात तीन कोरोना बळींची नोंद झाली. गुरुवारी एका मृत्यूची (Death) नोंद झाली होती. तर, एक हजार 732 नव्या कोरोना बाधितांचीही भर पडली. पोलीस विभागातील एकूण 122 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यापैकी 27 जण काल बाधित झाले. बाधित पोलिसांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आलंय.

44 जण मेडिकलमध्ये, तर 47 जण एम्समध्ये

शुक्रवारी लक्ष्मीनगर व आसीनगर झोनअंतर्गत दोन वृद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली. यातील एका रुग्णावर खासगी रुग्णालयात तर एकावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू होता. तर नागपूर जिल्ह्याबाहेरीलही एका कोविडबाधित वृद्ध महिलेचा शहरातील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 128 वर गेली आहे. यातील 2 हजार 604 मृत्यू हे नागपूर ग्रामीणमधील, 5 हजार 897 शहरातील तर 1 हजार 627 मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील आहेत. शुक्रवारी शहरातून 583 व ग्रामीणमधून 89 असे 672 जण ठणठणीत होऊन घरीही परतलेत. सद्यास्थितीत शहरात 6 हजार 866, ग्रामीणमध्ये 1 हजार 388 व जिल्ह्याबाहेरील 106 असे 8 हजार 360 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे असलेले 44 जण मेडिकलमध्ये, 10 जण मेयोत, 47 जण एम्समध्ये तर इतर रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तसेच लक्षणे नसलेले गृहविलगीकरणात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

रुग्ण वाढतायत पण 90 टक्के बेड रिकामे

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात तीन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. विभागातील सक्रिय रुग्णसंख्या 10 हजारावर गेलीय. पण रुग्णालयातील बेड मात्र रिकामे आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत 211 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी 89 रुग्णांना ॲाक्सिजनची गरज नाही, तर 26 रुग्णांना ॲाक्सिजन लावण्यात आलंय. यावरुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचं प्रमाण कमी आहे. असं आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितलं. पण लोकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

 

Published On - 10:18 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI