Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

वय वर्षे वीस. प्रेमाची नशा चढली. अल्पवयीन मुलीला घेऊन पळाला. पैशाची अडचण येताच चोरी केली. पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनाच धक्का देऊन पळाला. जंगलात सर्ज ऑपरेशन करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. कशा ते वाचा...

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?
पंकड उरकुडे

नागपूर : सोनेगावात (Sonegaon) घरफोडी झाली होती. याप्रकरणी आरोपीला दोन दिवस पीसीआर मिळाला होता. पंकज उरकुडे (वय 20) या आरोपीला अटक केल्यानंतर त्याची प्रकृती खराब झाली. त्यानं उलटी केली. त्यामुळं पंकजला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. औषधोपचारानंतर गाडीत बसत असताना पंकजने पोलिसांना धक्का मारला. तिथून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यामुळं पोलीस (Police) अधिकच सतर्क झाले. त्यांनी आरोपीच्या शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व उपाय शोधून काढले. त्याचा मित्र प्रणय ठाकरे हाही वांटेड होता. प्रणयला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पंकज कुठे जाऊ शकतो, याचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील खडकी येथील धाब्यावर पोलीस पोहोचले.

असा लावला पोलिसांनी छडा

खडकीत असलेल्या पंकजला पोलीस आपल्याला शोधण्यासाठी येतील, याची चाहूल लागली होती. त्यामुळं तिथून त्याने पोलीस येताच पळ काढला. खडकी गावातून नवरगावच्या जंगलात गेला. पोलिसांनी पंकजची माहिती गावकऱ्यांना शेअर केली. गावकऱ्यांनी व्हॉट्सअप गृपवर शेअर केली. त्यामुळं पोलिसांच्या हातावर तुरी देणारा आरोपीचे फोटो बऱ्याच लोकांना दिसले. दरम्यान, एक व्यक्ती जंगलात लपून बसल्याची तक्रार सिंदी रेल्वे पोलिसांत करण्यात आली. त्यावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यासाठी सोनेगाव पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटी आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी ही माहिती दिली.

प्रेयसीसाठी बनला चोर

महाकालीनगरातील पंकज उरकुडे याने मनीष ले-आऊटमध्ये राहणाऱ्या वकिलाच्या घरातून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरी केला होता. त्याच्या ताब्यातून एक लाख 74 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंकजने डिसेंबर 2021 मध्ये बेलतरोडी हद्दीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. मुलीसोबत तो मोर्शी येथे राहात होता. संसार चालविण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. त्यामुळे त्याने त्याचा खामल्यातील प्रणव ठाकरे याची मदत घेतली. दोघांनीही 29 डिसेंबर रोजी नीलेश शर्मा या वकिलाच्या घरी चोरी केली. घटनेच्या वेळी शर्मा हे कुटुंबीयांसह पचमढी येथे गेले होते. ही संधी साधून दोघांनीही त्यांच्याकडे घरफोडी केली.

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

MLA Shweta Mahale | आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार, बँकेच्या व्यवस्थापकास झापले; कसा झाला शेतकऱ्यांचा फायदा?

Nagpur | कोरोनाने आणले बंधन! मंगल कार्यालयात व्हिडीओ शुटिंग अनिवार्य; मेयो-मेडिकलमध्ये फेस शिल्डचा वापर

Published On - 5:41 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI