Nagpur Corona| धोका वाढतोय! नागपुरात कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांवर; एकूण बाधितांची नेमकी संख्या किती?

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांवर पोहचली. सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांच्या पलीकडं आहे. त्यामुळं कोरोनाचा धोका आणखी वाढत असल्याचं दिसतं. शिवाय आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय.

Nagpur Corona| धोका वाढतोय! नागपुरात कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांवर; एकूण बाधितांची नेमकी संख्या किती?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 10:18 AM

नागपूर : जिल्ह्यात गेल्या पावणेदोन वर्षांपूर्वीपासून कोरोनाशी (Corona) युद्ध पुकारले ते सुरूच आहे. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली. कोरोनाने पुन्हा अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला. जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून तर कोरोनाने पुन्हा एकदा आकांडतांडव घालण्यास सुरू केला आहे. तीन ते तेरा जानेवारी या दहा दिवसांचा विचार केल्यास, या कालावधीत जिल्ह्यात 98 हजार 194 चाचण्या झाल्यात. त्यापैकी सरासरी 8.73 टक्के अहवाल म्हणजेच नव्याने तब्बल 8,573 बाधित (Active) आढळलेत. म्हणजेच दिवसाला सरासरी 857 बाधितांची यात भर पडली आहे. जी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत केवळ दैनंदिन दहाहून कमी होती. तर 3 ते 13 जानेवारीदरम्यान दिवसाला 180 प्रमाणे 1800 जण या कालावधीमध्ये कोरोनावर मात केली. गुरुवारला जिल्ह्यात 13 हजार 693 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 15.24 टक्के म्हणजेच 2086 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत.

जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा पोहचला दहा हजारांवर

यामध्ये शहरातील 1589, ग्रामीणमधील 434 व जिल्ह्याबाहेरील 63 जणांचा समावेश आहे. यासोबचत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5.02 लाख 905 वर पोहचली आहे. तर आज ग्रामीणमधून 39, शहरातून 376 व जिल्ह्याबाहेरील 55 असे 470 जण ठणठणीत होऊन आपल्या घरीही परतले. जिल्ह्यातील एका कोरोना असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. 70 वर्षीय पुरुष संवर्गातील हा व्यक्ती कोविडमुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10125 वर गेली आहे. मेडिकल हॉस्पिटल येथे एका इतर कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या कोरोनाच्या नमुना सकारात्मक आढळून आला आहे. यापूर्वी मेडिकलमध्ये मृत झालेल्या अवस्थेत आलेल्या चार रुग्णांनाही कोरोना असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले होते. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झटपट वाढत असताना या मृत्युमुळे पुन्हा चिंता वाढली आहे.

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घटले

जिल्ह्यात कोरोनाचा आकांडतांडव सुरू आहे. दररोज या आजारातून बरे होणार्‍यांच्या तुलनेत बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात सातत्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तीन जानेवारी रोजी जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या केवळ 526 इतकी होती. त्यात या दहा दिवसांमध्ये 6,777 रुग्णांची भर पडून ती 7 हजार 303 वर पोहचली आहे. यात 6087 रुग्ण शहरातील, 1170 रुग्ण ग्रामीणमधील तर 46 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. कोरोनामुक्तांचे प्रमाण घटले आहे. अशा परिस्थितीचा सामना करताना आरोग्य प्रशासनही आता अलर्ट झाले आहे.

Nagpur | 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूरमध्ये, तर 96 वे संमेलन कुठे होणार?

Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.