Nagpur Ki Beti | नागपूर की बेटी, नागपूरची शान!, मालविका बनसोडने सायना नेहवालला तिसऱ्या फेरीत केले चित

इंडियन ओपन 2022 स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आलंय. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडूला नागपुरातील 20 वर्षीय मालविका बनसोड हिनं 34 मिनिटांत पराभूत केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील मालविकानं हा सामना 21-17, 21-9 असा जिंकून स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली.

Nagpur Ki Beti | नागपूर की बेटी, नागपूरची शान!, मालविका बनसोडने सायना नेहवालला तिसऱ्या फेरीत केले चित
नागपुरातील बॅडमिंटनपटू मालविका बनसोड
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 9:46 AM

नागपूर : इंडिया ओपन 2022 बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड (Malvika Bansod) हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. इंडियन ओपन 2022 स्पर्धेतील भारताची फुलराणी सायना नेहवालचे आव्हान गुरुवारी संपुष्ठात आले. जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन खेळाडूला वीस वर्षीय नागपूरच्या मालविका बनसोडने पराभूत केले. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या या सामन्यात मालविकाने सायनाला 21-17, 21-9 असा सलग सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष फोन करून तिचे अभिनंदन केले. मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तुझे करावं तेव्हढे कौतुक कमीच आहे. तू अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करत जा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे गौरोद्वगार डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्लीत आपल्या आईसोबत आलेल्या मालविकाशी बोलताना काढले. कस्तुरचंद पार्क येथील एका कार्यक्रमात मालविकाचा सत्कार केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी काढली.

कोण आहे मालविका बनसोड?

मालविका बनसोड ही महाराष्ट्राची प्रतिभावान बॅटमिंटनपटू आहे. तिने अंडर 13 आणि अंडर 17 मध्ये जेतेपद प्राप्त केले आहे. 2018 मध्ये वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. 2018 मध्ये काठमांडूमध्ये साऊथ एशियन बॅडमिंटर चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळविला. 2019 मध्ये ती ऑल इंडिया टुर्नामेंट जिंकली. भारताची नंबर वन बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूनंतर सायनाला पराभूत करणारी मालविका ही भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे.

पालकमंत्र्यांनी केले मालविकाचे कौतुक

नागपूरसारख्या शहरातून मालविका हिने इंडिया ओपन 2022 मध्ये सहभाग घेत केलेली कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. नागपूर शहरातून मालविका सारखे खेळाडू उंच भरारी घेत आहेत. मालविकाने केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहराचे नाव अजून एकदा जागतिक पातळीवर उंचावले आहे. भविष्यात मालविका अशीच उत्तोमोत्तम कामगिरी करीत राहील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजय मिळवत राहील, असा विश्वास यावेळी डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. मालविकाला भविष्यात जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ. राऊत यांनी तिच्याशी बोलताना म्हटले. कस्तुरचंद पार्क येथे 2020 मध्ये डॉ. नितीन राऊत यांनी मालविका हिचा सत्कार केला होता, ती नेहमी राऊत साहेबांची आठवण काढते, तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्या मुलीसोबत असू दया अशी प्रतिक्रिया मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोड यांनी यावेळी व्यक्त केली.

Nagpur | 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूरमध्ये, तर 96 वे संमेलन कुठे होणार?

Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.