Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?

एस कर्मचाऱ्यांच्या संपामुळं बस बंद आहेत. बंद असलेल्या बस ठेवल्या ठेवल्या खराब होण्याची शक्यता आहे. त्यांना सुरळित ठेवण्यासाठी नागपूर आगारात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?
नागपूर बसस्थानक
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 6:04 AM

नागपूर : संपामुळे (strike) बंद असलेल्या एसटी बसेस खराब होण्याची भीती आहे. बंद एसटी बस (Bus) खराब होऊ नये म्हणून मेकॅनिकल विभागात धडपळ सुरू आहे. बंद असलेल्या बसेस खराब होऊ नये म्हणून रोज 15 मिनिटे बस सुरू ठेवल्या जातात. बस खराब होऊ नये म्हणून आगारातंच बस फिरवल्या जातात. बसचे टायर खराब होऊ नये म्हणून टायरमधील हवा रोज चेक केली जात आहे. नागपुरातील गणेशपेठ आगारात बंद असलेल्या 100 बस चांगल्या स्थितीत आहेत.

बुधवारी धावल्या बारा बस

एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था म्हणून चक्क खासगी कंपनीकडे एसटीचे स्टेअरिंग सोपविले आहे. त्यामुळं नागपूर विभागात एसएसके सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड या खासगी एजन्सीच्या माध्यमातून बारा बसेस बुधवारला धावल्या. सरकारी बस आणि खासगी चालक असे समीकरण आता प्रशासनाने तयार केले आहे. तर संपकरी कर्मचार्‍यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचे सत्र सुरूच आहे. बुधवारला आणखी तेरा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले.

आतापर्यंत 121 कर्मचारी निलंबित

संपामुळे एसटीचे चाके थांबल्याने आता खासगी चालकांकडून बसगाड्या धावण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहे. संप मिटत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने अखेर एसटीचा गाडा पुढे रेटण्यासाठी खासगी एजन्सीला नियुक्त केले आहे. बुधवारला एसएसके सर्व्हिसेस प्रा. लि.कडून बारा खासगी चालकांनी बसचे परिचालन केले. तर बुधवारला संपकर्त्या कर्मचार्‍यांपैकी गणेशपेठ आगारातील नऊ चालक व चार वाहक असे तेरा कर्मचारी पुन्हा बडतर्फ करण्यात आले आहेत. यासोबतच एकूण बडतर्फ कर्मचार्‍यांची संख्या 121 वर पोहचली आहे. एसटी महामंडळाकडून चालकासाठी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांकडूनही अर्ज मागविण्यात आलेत. त्यापैकी काही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

नागपूर मनपातर्फे ब्रॅण्ड ॲम्बेसेडरची नियुक्ती; कोण आहेत हे नामवंत व्यक्ती?

Gondia Tiger | गोंदियात आढळला वाघाचा मृतदेह; नख आणि दात गायब, ही शिकार तर नाही ना?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.