नागपूर मनपातर्फे ब्रॅण्ड ॲम्बेसेडरची नियुक्ती; कोण आहेत हे नामवंत व्यक्ती?

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगतिले. ते मागील 28 वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करीत आहेत आहेत.

नागपूर मनपातर्फे ब्रॅण्ड ॲम्बेसेडरची नियुक्ती; कोण आहेत हे नामवंत व्यक्ती?
महापौरांसोबत तिन्ही नामवंत व्यक्ती.
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 4:58 PM

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 करिता नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) वतीने नागपूर शहराचे रँकिंग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी तीन ब्रॅण्ड ॲम्बेसेडरची नियुक्ती करण्यात आली. यात ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी, पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान गुरुदास राऊत आणि माय एफएम रेडिओचे आरजे राजन या तीन विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. महापौर कक्षात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नवनियुक्त ब्रॅण्ड ॲम्बेसेडरला नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे अनित कोल्हे, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सुरभी जयस्वाल, श्रिया जोगे, मेहुल कोसूरकर, अशोक काटेकर, नामेश्वर श्रीरामे आदी उपस्थित होते. या ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या माध्यमातून नागपूर शहरात स्वच्छतेबद्दल जनजागृती करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

कचरा विलगीकरणास प्राधान्य : कौस्तुभ चॅटर्जी

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगतिले. ते मागील 28 वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करीत आहेत आहेत. तसेच मागील 12 वर्षांपासून ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक आहेत. नागपूर शहराला स्वच्छ बनविण्यासाठी या मोहिमेत युवकांना सहभागी आवश्यक आहे. नागरिकांमध्ये सिंगल युज्ड प्लॉस्टिक वापराबाबत जनजागृती करून या स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेतल्यास नागपूर शहराची रँकिंग नक्कीच वाढेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांची मानसिकता बदलविणे गरजेचे : गुरूदास राऊत

सुबह की ताजी हवा, दुर करे दवा, असे म्हणत पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान गुरूदास राऊत यांनी लोकांची मानसिकता बदलविणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहर आपल्या आजूबाजूचा परिसर हे आपले घर आहे. अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्याची नितांत गरज आहे. अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यास हे शहर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर राहील. ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपले शहरसुध्दा स्वच्छ ठेऊ शकतो. विविध कार्यालयात जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यावर भर देणार असल्याचे गुरूदास राऊत यांनी सांगितले. गुरूदास राऊत हे 2020 च्या पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान होते. त्यांनी 2019 चा वर्ल्ड कपसुद्धा जिंकून दिला. ते मागील 13 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत.

शहर स्वच्छतेसाठी स्वत: पुढाकार घेणे आवश्यक : आरजे राजन

काम कोणतेही असो त्या‍त स्वत: पुढाकार घेणे आवश्यक आहे. रेडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वच्छतेविषयी जनजागृती करणार आहेत. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देणार असल्याचे माय एफएम रेडिओचे आरजे राजन यांनी सांगितले. आरजे राजन हे मागील तेरा वर्षांपासून रेडिओमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी टेलिव्हिजनवर मोठे-मोठे शो, सिंगिंग कार्यक्रमसुध्दा केलेले आहेत.

Bhandara | गोसेखुर्दने पाणी साठवणुकीचे उद्दिष्ट गाठले; याचा बाधित गावांवर काय होणार परिणाम?

weather forecast | विदर्भात ऊन-पावसाचा खेळ सुरूच; येत्या दोन दिवसांत काय सांगतो हवामानाचा अंदाज?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.