AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 व्या वर्षी अविवाहित असणाऱ्या प्राजक्ता माळीचं प्रेमाबद्दल मोठं विधान, ऐकून चाहते करत आहेत कौतुक

सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी आणि 36 व्या वर्षी देखील अविवाहित असणाऱ्या प्राजक्ता माळीचं प्रेमाबद्दल मोठं विधान.

| Updated on: Feb 12, 2026 | 1:48 PM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

1 / 7
उत्कृष्ट अभिनय, प्रभावी निवेदन, नृत्यकलेतील प्रावीण्य आणि यशस्वी उद्योजक म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या सौंदर्याने, साधेपणाने आणि अभिनयातील सहजतेने प्राजक्ताने तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे.

2 / 7
अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाही प्राजक्ताने आपली वेगळी छाप पाडली आहे.

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाही प्राजक्ताने आपली वेगळी छाप पाडली आहे.

3 / 7
मात्र, आज वयाच्या 36 व्या वर्षीही प्राजक्ता माळी अविवाहित आहे. मात्र याबाबत ती पूर्णपणे आत्मविश्वासात असून समाजाच्या अपेक्षा किंवा दबावाला ती महत्त्व देत नाही. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने प्रेम आणि नात्यांविषयी अत्यंत परखड आणि विचारपूर्वक मत मांडले आहे.

4 / 7
ती म्हणाली, 'प्रेम हा विषय सगळ्यांनाच आवडतो पण तो तितकाच गुंतागुंतीचाही आहे. जे लगेच, उत्स्फूर्तपणे वाटतं, ते मला प्रेम वाटत नाही. ते केवळ आकर्षण असतं. प्रेम तेव्हाच घडतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक किंवा आत्मिक नातं असतं.'

5 / 7
'अशी एक फिलॉसॉफी आहे की मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार बनतो. जर मागील जन्मातील शत्रुत्व सौम्य असेल तर या जन्मातलं नातंही सौम्य आणि समंजस असतं. माझं वाचन खूप असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच माझ्यासाठी बदलून गेली आहे असं तिने म्हटलं आहे.

6 / 7
तिच्या या विचारांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून अनेकांनी तिच्या या विचारांचे कौतुक केले आहे. प्रेमाकडे केवळ भावनिक नजरेने न पाहता  त्यामागील आत्मिक आणि वैचारिक पैलूंवर भर देणारी प्राजक्ताची भूमिका अनेक तरुणांना विचार करायला लावणारी ठरत आहे.

7 / 7
Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर