Nagpur | कोरोनाने आणले बंधन! मंगल कार्यालयात व्हिडीओ शुटिंग अनिवार्य; मेयो-मेडिकलमध्ये फेस शिल्डचा वापर

वैद्यकीय यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व अन्य मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दोन मास्कसह फेस शिल्ड वापरावे. रुग्णांची संख्या वाढत असताना कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होणार नाही. यासाठी सर्व ती काळजी घ्यावी.

Nagpur | कोरोनाने आणले बंधन! मंगल कार्यालयात व्हिडीओ शुटिंग अनिवार्य; मेयो-मेडिकलमध्ये फेस शिल्डचा वापर
नागपुरात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी.

नागपूर : जिल्ह्यात बुधवारी कोरोना (Corona) बाधितांची रुग्ण संख्या दोन हजारांवर गेली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अशाच पद्धतीचे रुग्ण वाढ सातत्याने असल्यास पुन्हा कडक निर्बंध लादले जातील. त्यामुळे बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मेयो, मेडिकल (Medical) व अन्य वैद्यकीय यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व अन्य मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दोन मास्कसह फेस शिल्ड वापरावे. रुग्णांची संख्या वाढत असताना कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होणार नाही. यासाठी सर्व ती काळजी घ्यावी. तसेच या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रुग्णांच्या नातेवाईकांवर देखील कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक सुरक्षा यंत्रणेला देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

लग्नांवरही राहणार करडी नजर

मंगल कार्यालय सोबतच मोठ्या हॉटेल्समध्ये होणाऱ्या लग्नावरही करडी नजर ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यापुढे कोणतेही लग्न कार्यालय होत असेल तर त्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देणे अनिवार्य असेल. कोरोनाची लाट असतानाही लग्न कार्य व कार्यक्रम होत असतील तर त्याचे व्हिडिओ शूटिंग करणे आता मंगल कार्यालयाच्या मालकांना अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने पुरावा मागितल्यास ते सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही, याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हात 175 ओमिक्रॉनबाधित

दुसऱ्या लाटेतही डेल्टाच्या तपासणीत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) सलाईन गार्गल या जिनोम सिक्वेंसिंगची पद्धत तपासणीसाठी वापरत होते. नीरीमध्ये जिनोम सिक्वेसिंग सुरू झाले होते. याचा लाभही होत होता. मात्र, नमुने हैद्राबाद येथे पाठवण्यात येत होते. अलीकडे जिनोम सिक्वेसिंग पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत करण्यात येते. याचे अहवाल मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत आहेत. मात्र, नीरीतून आलेल्या चाचणीत 73 नमुने तपासले असता 73 ही ओमिक्रॉनबाधित आढळले. सहा जानेवारी रोजी नीरीतून केलेल्या चाचणीत 51 जण ओमिक्रॉनबाधित आढळले होते. नीरीतील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 124 झाली आहे. तर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून आतापर्यंत 51 जणांचे नमुने ओमिक्रॉनबाधित आढळले. अशाप्रकारे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण 175 ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

Nagpur | ओ काट, जरा सांभाळून! नागपुरात आज उड्डाणपुलावरून वाहतूक बंद; कारण काय?

Nagpur elections | मनपा निवडणुकीत वाढणार अडचणी? भूमिपूजनाचे फोटो अपलोड; प्रत्यक्ष कामच नाही!

 

Published On - 12:43 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI