AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | ओ काट, जरा सांभाळून! नागपुरात आज उड्डाणपुलावरून वाहतूक बंद; कारण काय?

पतंगोत्सव असल्यानं आज ओ काटची हाक सकाळपासूनच सुरू झाली आहे. पण, या नादात कुणाचे गळे कापू नये, यासाठी नागपुरात उड्डाणपूल बंद करण्यात आले आहेत. शिवाय पोलीसही नायलॉन मांजाचा वापर करून ओ काट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Nagpur | ओ काट, जरा सांभाळून! नागपुरात आज उड्डाणपुलावरून वाहतूक बंद; कारण काय?
नागपुरात पतंग उडविताना पतंगबाज
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 11:53 AM
Share

नागपूर : मकर संक्रांतीमुळे आज अनेकजण पतंग (Kite) उडवतात. बंदी असतानाही काही लोक नायलॅान मांजा वापरतात. त्यामुळेच नायलॅान मांजाने अपघात होऊ नये म्हणून आज नागपुरातील उड्डाणपुल (flyover) बंद ठेवण्यात आलेत. उड्डाणपुल सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे. उड्डाणपुलावर नायलॅान मांजामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शहरातील सदर उड्डाणपुल, छत्रपती उड्डाणपुल, गोवारी उड्डाणपुलासह सर्व उड्डाणपुल बंद ठेवण्यात आलेत. उड्डाणपुला शेजारी नागपूर पोलीस तैनात करण्यात आलेत. ओ काट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचं एएसआय विनोद जनबंदू यांनी सांगितलं. पतंगबाजांकडून होणारी कापाकापी थांबविण्यासाठी एक हजार दोनशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

दुचाकी वाहनचालकांनी काळजी घ्यावी : पालकमंत्री

मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचे आवाहन केलेले आहे. पतंग उडविण्याचा आनंद ही या सणाची पर्वणी. मात्र, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांनी भीतीचे वातावरण निर्माण होते. नायलॉन मांजावर बंदी आहे. पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करीत आहेत. मात्र जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपल्या आसपास नायलॉन मांजाची विक्री निदर्शनास आल्यास प्रशासनास कळवावे, अशी कळकळीची विनंती राऊत यांनी केली.

अशी घ्या काळजी

विजेच्या तारांवर अडकलेला पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. उंचावरून पतंग उडवताना इमारतींच्या कठड्याजवळ उभे राहू नये. घरावरून विजेची तार गेली असल्यास पतंग उडवताना सावध राहा. पतंग उडवताना विजेची तार, फीडर व वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. कटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर वेडेवाकडे धावू नये. लहान मुलांच्या हातात मांजा देताना सावध राहणे गरजेचे आहे, मांजा धारदार असल्याने बोटे कापण्याची शक्यता असते. पतंग उडवताना रेल्वे रुळ परिसरापासून दूर राहा. नायलॉन मांजा तसेच प्लास्टिक पतंगामुळे पक्षी आणि माणसांचेही प्राण जाऊ शकतात. दुचाकी वाहनचालकांनी पुढील आठवडा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपले वाहन सावधतेने चालवा. लहान मुलांना बाईकवर पुढे बसवू नका. पतंगाच्या दोरामुळे लहान मुलांच्या मानेला, चेहऱ्याला, डोळ्याला इजा होऊ शकते. हेल्मेटचा नियमित वापर करा व वाहन चालवताना गळ्याभोवती मफलर किंवा रुमाल गुंडाळून घ्या.

Nagpur | 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूरमध्ये, तर 96 वे संमेलन कुठे होणार?

Nagpur ST | एसटी संपामुळं बसची चाकंच फिरली नाहीत, खराब होण्याची भीती; नागपुरात दुरुस्तीसाठी काय व्यवस्थापन?

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.