2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका

2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका
ट्रकच्या अपघातात एकाचा बळी

Solapur Accident : सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरु लागला असतानाच आता सोलापुरातील मुख्याध्यापक भवनासमोर मंगळवारी अपघात झाला आहे.

रोहित पाटील

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 2:59 PM

सोलापूर : सोलापुरातील अपघातांची (Solapur Accident) मालिका सुरुच आहेत. मंगळवारी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकने चिरड्यामुळे शीतलनाथ आहेरकर यांचा अपघातात जागीच जीव गेला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याचीही माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघाताचा पंचनामा करुन पोलिसांनी मृत शीतलनाथ आहेरकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शासकीय रुग्णालयातही पाठवला आहे. दरम्यान, सध्या सोलापूर पोलीस या अपघातप्रकरणी आणखी तपास करत आहेत. नेमका हा अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतल्याचीही माहिती दिली आहे. या ट्रकवरील माहितीच्या आधारं फरार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातो आहेत.

कुठे घडला अपघात?

दोन दिवसांपूर्वी सोलापुरात एका भीषण अपघात घडला होता. या अपघातात एका स्कॉर्पियोतून जाणाऱ्या तीन तरुणांवर जागीच काळानं घाला घातला. काम आटोपून घरी परतत असणाऱ्या तिघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचं देखील मोठं नुकसान झालं होतं. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरु लागला असतानाच आता सोलापुरातील मुख्याध्यापक भवनासमोर मंगळवारी अपघात झाला आहे.

वाढत्या अपघाताच्या घटनांनी चिंता

सोलापुरातील वाढत्या अपघाताच्या घटनांनी चिंता व्यक्त केली जाते आहे. सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महमार्गावर गेल्या महिन्याभरात अपघाताचं प्रमाण लक्षणीय असून वाढत्या अपघातात प्रवाशांचा जीव जाण्याच्या घटनांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अशातच सोलापुरातील मुख्याध्यापक भवनासमोरही अपघात झाल्यानं सोलापुरातील अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नसल्याचंच पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

संबंधित बातम्या :

Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात

Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात

Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें