Wardha : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने शेतकऱ्याकडे मागितली लाच, मग…

| Updated on: Feb 28, 2023 | 12:18 PM

देवळी तालुक्यातील अडेगाव येथील वीज वितरण केंद्रात लाच घेताना कनिष्ठ अभियंता ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांची सुध्दा चौैकशी करण्यात येणार आहे.

Wardha : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने शेतकऱ्याकडे मागितली लाच, मग...
farmer
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वर्धा : शेतामध्ये कॅनलमधून (canel) पाणी नेण्यासाठी लवकर वीज मीटर लावून देतो, याकरिता शेतकऱ्याकडे (farmer) कनिष्ठ अभियंत्याने लाच मागितली. त्यानंतर शेतकऱ्याने हे सगळ प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कानावर घातलं. अधिकाऱ्यांनी सापळा रचून कनिष्ठ अभियंत्याला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर देवळी पोलिस स्टेशनमध्ये (devali police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आणखी काही शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे का ? हे सुध्दा तपासून पाहिलं जाणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

शेतीला पाणी देण्यासाठी लवकर वीज मीटर लावून देतो. याकरिता शेतकऱ्याला लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला एसीबीने ताब्यात घेतलं. ही कारवाई अडेगाव वीज वितरण केंद्रात करण्यात आली. कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे यास एक हजार रुपये लाच घेताना एसीबीने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिथल्या इतर अधिकाऱ्यांची सुध्दा चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली

तक्रारदार शेतकरी यांचे देवळी तालुक्यातील गौळ येथे शेत आहे. त्यांच्या शेतात कॅनलवरुन ओलीतासाठी पाणी घेण्याकरिता शेतात वीज मीटर लावण्यासाठी कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली. अभियंत्याने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा

वीज कंपनी शेतीसाठी रात्री वीज पुरवठा करीत असल्यामुळे शेतकरी अधिक टेन्शनमध्ये आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतामध्ये प्राणी असल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा दिवसाची वीज मागून सुध्दा त्यांना वीज देण्यात आलेली नाही.